कोपर्डीप्रकरणी सहा महिन्यांत निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे विनंती करा, राज्य सरकारकडे खासदार संभाजीराजेंची मागणी

Sambhaji Raje will meet the Chief Minister to gave justice victim's family in Kopardi
कोपर्डीतील पीडित कुटुंबियाला न्याय न मिळणं हे दुर्दैवी, संभाजीराजे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर हा मुद्दा चांगलाचं तापला आहे. मराठा आंदोलनाची सुरुवात ज्या गावापासून झाली त्या कोपर्डीत आज खासदार संभाजीराजे छत्रपती दौरा करणार आहेत. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे संभाजीराजे राज्यातील सर्व मराठा नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटगाठी घेत आहेत. दरम्यान कोपर्डीप्रकरणी खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला सवाल करत सहा महिन्यात निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयात विनंती करा, अशी राज्य सरकारकडे मागणी केली आहे.

आज संभाजीराजे नगर जिल्ह्यातील कोपर्डीचा दौरा करणार आहेत. कोपर्डी बांधलेल्या स्मृतीस्थळाला आणि पीडितेच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. याच अनुषंगाने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस संभाजीराजे म्हणाले की, ‘आता २०२१ असून याप्रकरणी का निकाल लागला नाही, पुढची कारवाई का झाली नाही? म्हणून विशेष खंडपीठाची नेमणूक करून या सहा महिन्यात उच्च न्यायालयाने निकाल द्यावा, असा अर्ज राज्य सरकारने दाखल करावा. लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी.

२०१६ साली कोपर्डीमधील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर पीडितेला न्याय देण्यासह इतर मागण्यासाठी मराठा समाज एकवटला. २०१७ साली कोपर्डीप्रकरणी निकाल लागला. हायकोर्टापर्यंत प्रकरण गेले. आता दोषींना संधी देण्याचा दोन वर्षाचा कालावधी देखील संपला. पण अजूनपर्यंत पुढील कारवाई झाली नाही. त्यामुळे संभाजीराजे यांनी राज्य सरकारला हायकोर्टात अपील करण्याची मागणी केली.


हेही वाचा- बाळासाहेबांनी विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं