घरताज्या घडामोडीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा टोलधाड

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा टोलधाड

Subscribe

1 एप्रिलपासून टोलचे दर 18 टक्क्यांनी वाढणार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून (एक्स्प्रेस वे) प्रवास करणार्‍या प्रवाशांना पुन्हा टोलधाडीचा सामना करावा लागणार आहे.1 एप्रिलपासून द्रुतगती महामार्गावरील टोल दरांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे असा प्रवास करणार्‍या वाहनधारकांच्या खिशाला झळ बसणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर 3 वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार 2023 मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये टोलमध्ये वाढ झाली होती. 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) स्पष्ट करण्यात आले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याला जायचे असो वा पुण्याहून मुंबईला, बहुतांश वाहनधारक याच मार्गाला प्राधान्य देतात. त्यामुळे बर्‍याचदा या द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होते. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघात हे दोन्ही विषय कायम चर्चेत असतात. यावर अनेकदा प्रशासनाला प्रश्न विचारले जातात, मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत.

- Advertisement -

टोलवाढ मात्र केली जाते, असा वाहनचालक आणि प्रवाशांचा आरोप आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. हा पहिलाच मृत्यू नाही, तर याआधीही अनेकांनी या ठिकाणी आपला जीव गमावला आहे.

1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2030 पर्यंत टोलचे दर – 
– वाहन आताचे दर 1 एप्रिलपासूनचे दर
– चारचाकी 270 320
– टेम्पो 420 495
– ट्रक 580 685
– बस 797 940
– थ्री एक्सेल 1380 1630
– एम एक्सेल 1835 2165

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -