घरताज्या घडामोडीशेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन

शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन

Subscribe

शेगावमधील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८२व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांमुळे भक्तांनी येऊ नये, असे आवाहन संस्थेने केले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून शिवशंकर पाटील यांची प्रकृती खालावली होती. आज डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान अंत्यविधीबाबत कोणताही निर्णय झाला नाही आहे. पण सध्या भक्तांची गर्दी वाढणार असल्याच्या अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक

- Advertisement -

शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, श्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब आणि वंचिताची सेवाही केली. त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील अशा पण सत्य आहेत. श्री. गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवशंकर पाटील यांच्या निधनांची बातमी समजताच विरोधी पक्षनेते आणि राज्याची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगी सुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’

- Advertisement -

तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शोक व्यक्त केला.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -