घरमहाराष्ट्रठाण्यातील पर्यटन स्थळे ३१ जुलैपर्यंत बंद

ठाण्यातील पर्यटन स्थळे ३१ जुलैपर्यंत बंद

Subscribe

ठाणे जिल्ह्यात धबधबे, जलाशय व धरण यासारखी पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई व रायगड यासह ठाण्याच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात धबधबे, धरणे व जलाशयांवर येत असतात. पर्यटनस्थळावर आलेले पर्यटक खोल पाण्यात उतरणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे, मद्यपान करणे असे गैरप्रकार करत असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हादंडाधिकार्‍यांनी ठाण्यातील धबधबे, जलाशय व धरणे ३१ जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पावसाळ्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यावेळी अनेक पर्यटक वेगाने वाहणार्‍या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात जाणे, धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, धोकादायक ठिकणी सेल्फी काढणे, धबधब्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यपान करणे, वाहन अतिवेगाने चालवणे असे अनेक प्रकार सर्रास केले जातात. त्यामुळे अनेक पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी या उद्देशाने ठाण्याचे जिल्हादंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी 31 जुलैपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सर्व पर्यटने स्थळे बंद ठेवण्याचे प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत.

- Advertisement -

ही पर्यटन स्थळे असणार बंद
ठाणे तालुक्यातील येऊर येथील धबधबा, कळवा मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा बायपास येथील धबधबे, घोडबंदर, उत्तन सागरी किनार ही पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कल्याण तालुक्यातील खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी तर मुरबाड ताुक्यातील माळशेज घाट, पाडाळे डॅम, सिद्धगड, सोनावळे लेण्या, डोंगरन्हावे, गोरखगड, नाणेघाट, धसई डॅम, आंबेटेंबे बंद असणार आहेत. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर, शहापूर तालुक्यातील माहुली गडावरील धबधबा, भातसा जलाशय, अशोका धबधबा, भातसा सापगाव नदीकिनारा तर अंबरनाथमधी कोंडेश्वर, धामणवाडी, दहिवली ही पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -