घरमहाराष्ट्रपुणे परिमंडळातील २६.२५ लाख वीजग्राहकांना ’एसएमएस’द्वारे सेवा

पुणे परिमंडळातील २६.२५ लाख वीजग्राहकांना ’एसएमएस’द्वारे सेवा

Subscribe

वीजबिलांचा तपशील व मीटर रिडींगसह इतर माहिती वीजग्राहकांच्या मोबाईलवर ’एसएमएस’द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येत आहे.

वीजबिलांचा तपशील व मीटर रिडींगसह इतर माहिती वीजग्राहकांच्या मोबाईलवर ’एसएमएस’द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या २६ लाख २५ हजार वीजग्राहकांना ही सेवा सुरु करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे वीजग्राहकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतून सुद्धा ’एसएमएस’ उपलब्ध आहे.पुणे परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह इतर वर्गवारीत २७ लाख २४ हजार वीजग्राहक आहेत.

त्यापैकी २५ लाख २६ हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. तसेच १ लाख १४ हजारांपैकी ९८,४०४ कृषीपंपधारकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. सद्यस्थितीत ’एसएमएस’द्वारे ग्राहक क्रमांक व बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठ्याचा कालावधी वीजग्राहकांना ’एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे. यासोबतच ’एसएमएस’द्वारे मिळालेल्या वीजबिलाच्या तपशिलावरून वीजग्राहकांना देयकाचा भरणा करणे शक्य झाले आहे.

- Advertisement -

कसा पाठवावा एसएमएस
महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्गात ’एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. विशेष म्हणजे ’एसएमएस’ची सेवा मराठी भाषेतूनही सुरु करण्यात आली आहे. ’एसएमएस’ची भाषा बदलण्यासाठी मराठीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) १ तर इंग्रजीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) २ असे टाईप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ’एसएमएस’ पाठवावा लागेल.

मोबाईलच्या नोंदणीची सोय
महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ’एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर (स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ’एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४x७ सुरु असणा-या कॉल सेंटरचे १९१२ किंवा१८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅापद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -