घरमहाराष्ट्रकिरवली टोलनाक्यावर पकडले दोन ट्रक

किरवली टोलनाक्यावर पकडले दोन ट्रक

Subscribe

80 लाखांचा गुटखा जप्त, ५ जणांवर गुन्हा

बंदी असलेला गुटखा रायगड जिल्ह्यात सर्रास विकला जात असून, पेण येथील अन्न आणि औषधे विभागाच्या अधिकार्‍यांनी गेल्या ९ जानेवारी रोजी किरवली टोलनाका (तळोजे, ता. पनवेल) येथे गुटख्याची वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले आहेत. सर्व चौकशीनंतर या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीवरून अन्न आणि औषधे विभाग, सेवाकर विभागातील अधिकार्‍यांनी एमएच 04 एफडी 9953 आणि एमएच 04 एचवाय 3889 हे दोन ट्रक पकडून तपासणी केली असता त्यात 78 लाख 45 हजार 24 रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम 328, 188, 273 आणि 274 अंतर्गत तळोजे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दोन्ही ट्रकचे परवाने रद्द करण्यासाठी वसई आरटीओला कळविण्यात आले आहे.

- Advertisement -

ही कारवाई सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण दराडे यांच्या नेतृत्त्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बा. औ. शिंदे, श्रीमती सु. ना. जगताप, प्रियंका भंडारकर, प्र. मा. पवार, वरिष्ठ लिपिक ना. द. वस्त, दे. मो. पाटील, म. भि. भगत यांनी केली.दरम्यान, बंदी असलेल्या गुटख्याची रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम, तर काही ठिकाणी छुपी विक्री सुरू आहे. कधीतरी लुटुपुटुच्या धाडींचे नाटक करून मोठी आर्थिक तडजोड केली जात असल्याचे बोलले जाते.

रायगड जिल्ह्यात कुठेही छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट आणि सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट सुगंधित सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याचे तंबाखू, खर्रा, मावा यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री होत असल्यास प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर अथवा कार्यालयातील दूरध्वनी 02143-252085 येथे संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण दराडे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -