घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी राजचे स्वप्न पूर्ण केले

उद्धव ठाकरेंनी राजचे स्वप्न पूर्ण केले

Subscribe

विधानसभा निवडणुकी वेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी राज्याला मजबूत विरोधी पक्ष मिळावा असे म्हटले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावाचे ते स्वप्न पूर्ण केले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सत्ताधार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी छगन भुजबळांनी जोरदार टोलेबाजी केली. आम्ही विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षाने ही गोष्ट लक्षात घ्यावी. आता विरोधकांनी आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. त्यासाठी रात्रीचे खेळ बंद झाले तर बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी कोपरखळी मारली.

- Advertisement -

रात्रीचे खेळ करणारे नेते विरोधी पक्षात असल्याने ही भीती व्यक्त करत असल्याचे ते पुढे म्हणाले. सत्ता असताना काहींनी माझे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मला राग नाही.

माझा आवाज त्यामुळे कमी होणार नाही. सभागृहात असतो, तितकाच तो बाहेरदेखील असतो, असे भुजबळ यांनी म्हटले.
मी पुन्हा येईन यावरूनही भुजबळांनी फडणवीसांना टोला लगावला. आपण परत आलात. तुम्ही शब्द खरा करून दाखवलात. विरोधी पक्षनेते हे मोठे पद आहे. तुमच्याकडे मंत्रिपदाचा दर्जा आहे. विरोधी पक्षनेत्याला अनेकांना अंगावर घ्यावे लागते. नंतर त्याचा त्रास होतो. मात्र त्याशिवाय जनतेला न्याय देता येत नाही, याची मला जाणीव नाही. मी त्या पदावर काम केले आहे, असे भुजबळ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -