घरमहाराष्ट्रही पहिली निवडणूक समजून तयारीला लागा; उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना स्फुल्लिंग

ही पहिली निवडणूक समजून तयारीला लागा; उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना स्फुल्लिंग

Subscribe

शिवसेनेसोबत मुस्लिम समाज आहे. अमराठी लोक आहेत. गुजराती, उत्तर प्रदेशची जनता आहे. कोरोना काळात कोणताही भेदभाव न करता मी सगळ्यांचे प्राण वाचवले. १९९२-१९९३ मध्ये देशद्रोह्यांनी थैमान घातलं होतं. तेव्हा शिवसैनिकांनी दर्ग्याचंही रक्षण केलं होतं. हीच आमच्या आजोबांची शिकवण आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणात वेगाने सत्तांतर झालं. त्यानंतर आता पुढील निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशी अटीतटीची लढाई पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदेंना हरवण्याचा चंग बांधला असून उद्धव ठाकरे यांनी आज गटनेत्यांना प्रोत्साहित केलं. ही आपल्या आयुष्यातील पहिली निवडणूक आहे असं समजा आणि तयारीला लागा, असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांमध्ये स्फुल्लिंग चेतवलं. आज गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेनेचे गटनेता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

हेही वाचा – तुम्ही जमीन काय दाखवणार, आम्हीच आस्मान दाखवू; उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना खुलं आव्हान

- Advertisement -

“देवेंद्र फडणवीस म्हणाले ही त्यांची शेवटची निवडणूक. पण आपल्या आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे असं समजा लढा”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं उदाहरण दिलं. त्यांची सगळी गाणी का लोकप्रिय होतात यावर आशा भोसले यांनी समर्पक उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की मी प्रत्येक गाणं माझ्या आयुष्यातील पहिलं गाणं समजून गाते, म्हणून माझी गाणी लोकप्रिय होतात, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी आज शिवसैनिकांना सांगितली आणि त्याचप्रमाणे कामाला लागण्याचं आवाहन केलं.

हेही वाचा – शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत? व्यासपीठावर खुर्ची ठेवली राखीव

- Advertisement -

“महापालिका बरखास्त झाली आहे, नगरसेवक नाहीत, गेलेले खासदार, आमदार गेल्या निवडणुकीतच पडले. त्यामुळे आता लागा कामाला, खळाळता झरा पुन्हा कामाला लागला पाहिजे. शिवसेनेची प्रत्येक शाखा उघडी राहिली पाहिजेच. त्यात गटप्रमुख असलाच पाहिजे. आपण अनेक कामं केली आहेत. ही कामं आता लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं पाहिजे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“२०१२ ची निवडणूक आपण दोन शब्दांवर जिंकली ती म्हणजे करून दाखवलं. २०१७ ची निवडणूक हे तुम्हाला माहितेय का यावर निवडणूक लढवली. आता जे बोलतोय ते करतोय, करून दाखवलं आहे हे लोकांना सांगायचं आहे,” असं मार्गदर्शन ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं.

संघर्षाच्या वाटेवरून चालण्याची हिंमत ठेवा

“यावेळेला लढाई कशी होणार हे लक्षात घ्या. मुंबई महापालिकेसाठी पंतप्रधान मैदानात उतरणार आहेत. मुन्नाभाई आहे.  सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट पाहतो, आणि आम्ही त्याच लढाईची वाट पाहतोय. काही काळ तरी संघर्षाच्या वाटेवरून चालण्याची हिंमत आहे का,” अशी साद घालत मी आव्हान देतो की कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाही.

हेही वाचा – …म्हणून मी कमळाबाई म्हणतो, उद्धव ठाकरेंची मेळाव्यात भाजपाविरोधात तुफान बॅटींग

शिवसैनिकांनी दर्ग्याचंही रक्षण केलं

“शिवसेनेसोबत मुस्लिम समाज आहे. अमराठी लोक आहेत. गुजराती, उत्तर प्रदेशची जनता आहे. कोरोना काळात कोणताही भेदभाव न करता मी सगळ्यांचे प्राण वाचवले. १९९२-१९९३ मध्ये देशद्रोह्यांनी थैमान घातलं होतं. तेव्हा शिवसैनिकांनी दर्ग्याचंही रक्षण केलं होतं. हीच आमच्या आजोबांची शिकवण आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -