घरताज्या घडामोडीऔरंगाबादचा होणार कायापालट; निजामकालीन शाळांचीही डागडुजी : मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

औरंगाबादचा होणार कायापालट; निजामकालीन शाळांचीही डागडुजी : मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Subscribe

औरंगाबाद शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवन उभारणीच्या कामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला.

मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था तातडीने सुधारण्यासह सातारा-देवळाई मधील भूमिगत मलनि:सारणाची समस्याही दूर केली जाईल. मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांचे रूप बदलण्यासाठी उपाययोजनांबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद विकासकामांबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली असून ही कामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. श्री संत एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी दिले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रगतीपथावरील तसेच विविध प्रस्तावित प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील निजामकालीन शाळांची डागडूजी करण्याचे निर्देश दिले आहेत. औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्याअंतर्गत १४४ शाळा आहेत. या शाळा निजामकालीन असून त्यातील अनेक शाळा मोडकळीस आल्या आहेत. या शाळांच्या पुनर्बांधणी आणि दुरुस्तीचा शाश्वत कार्यक्रम हाती घेऊन दीर्घकाळ टीकणारी गोष्ट करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

औरंगाबाद शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था तातडीने सुधारण्यासह सातारा-देवळाई मधील भूमिगत मलनि:सारणाची समस्याही दूर केली जाईल. मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांचे रूप बदलण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं आहे. औरंगाबादची विविध विकासकामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्यासह औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाईल. श्री संत एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरु करून संत परंपरा आणि साहित्याच्या अभ्यास-संशोधनाला चालना देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

औरंगाबाद शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवन उभारणीच्या कामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. तसेच हे स्मृतिवन स्थानिक वृक्षसंपदेच्या जतनासाठी तसेच पक्षी उद्यान म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे औरंगाबाद ते शिर्डी हे ११२.४० किमीचे काम वेगाने पूर्ण होत असून यामुळे औरंगाबाद व शिर्डी विमानतळ जोडले जाईल. आता औरंगाबाद-शिर्डी या मार्गावर विमान सेवा सुरु करण्याच्या पर्यायाचा विचार करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -