घरमहाराष्ट्रUnseasonal Rain : वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपून काढलं; पिकांचं मोठं नुकसान

Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपून काढलं; पिकांचं मोठं नुकसान

Subscribe

आज राज्यात काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला होता. त्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसानं धुमाकूळ घातला. राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळाला तर काही भागात गारपीटही झाली. अवकाळी पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. 

अमरावती : राज्यात सध्या उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे, मात्र काही भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरीही पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आधीच वर्तविली होती. तर आज राज्यात काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला होता. त्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसानं धुमाकूळ घातला. राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळाला तर काही भागात गारपीटही झाली. अवकाळी पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. (Unseasonal Rain Heavy rain accompanied by gale force winds Heavy loss of crops)

हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, भंडाऱ्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला होता, तर आज सकाळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण होते. मात्र मंगळावारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर विजेच्या कडकडाटासह परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. यवतमाळ, राळेगाव, बाभूळगाव, कळंब, आर्णी यासह इतर भागात या अवकाळी पाऊस पडला.

- Advertisement -

वर्धा आणि परभणीतही अवकाळी पावसाची हजेरी

वर्ध्यात मध्यरात्रीपासून आकाशात ढगांचा आवाज करत विजेच्या कडकडाटसह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कारंजा तालुक्यातील काही गावांमध्ये वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. याशिवाय आज पहाटेच्या सुमारास ढगाळ वातावरण असताना पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आज दुपारपर्यंत काही भागात जोरदार पाऊस पडत आहेत, तर काही भागात रिपरिप सुरू होती. तर परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. परभणी, पूर्णा, गंगाखेड, पालम या चार तालुक्यांसह इतर ठिकाणीही जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांनाही अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे.

पिकांचं मोठं नुकसान

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा, निंबू, टरबूज आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अमरावतीत संत्रा,कांदा, गहू, बुलढाणा जिल्ह्यात रब्बी ज्वारी, कांदा या पिकांसह फळ बागा, जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी, बाजरी आणि काढणीला आलेली अनेक पीके जमीन दोस्त झाली आहेत. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -