घरमहाराष्ट्रUnseasonal Rain: अवकाळी पावसाचा मुक्काम कायम; पुढील चार दिवस पावसाचे

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा मुक्काम कायम; पुढील चार दिवस पावसाचे

Subscribe

आज पुन्हा अवकाळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईतही सध्या ढगाळ वातावरण आहे.

मुंबई: मागच्या आठवड्यापासून देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावासाने राज्यातील अनेक भागांत हजेरी लावली आहे. आज पुन्हा अवकाळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईतही सध्या ढगाळ वातावरण आहे. (Unseasonal Rain Stay of unseasonal rain Next four days of rain Regional Meteorological Centre RMC)

राज्याात विविध भागांत पडलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांत शेती, फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. काही भागांत गारपीटही झाली आहे. आज रविवारीही राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. पुढील 4 दिवस अजून अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

पुढील चार दिवस पावसाचे

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे. तर, पुढील 48 तासांत सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावासाची हजेरी पाहायला मिळणार आहे. काही भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, राज्यासह देशात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, वर्धा,नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू आणि संत्रा पिकांचे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तीळ आणि ज्वारी या पिकाचे अतोनात नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून वातवरणात बदल झाला आहे. मंगळवारी रात्री दरम्यान वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील खडकी बोरगाव, मोय खेडा दिगर, फतेपूर फेक्री या गावांना मंगळवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांसह शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. तेल्हारा, अकोट, बाळापूर आणि अकोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तर पातूर तालुक्यातल्या मळसूर भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -