घरदेश-विदेशLive Update : काँग्रेसने 10 उमेदवारांची यादी जाहीर केली

Live Update : काँग्रेसने 10 उमेदवारांची यादी जाहीर केली

Subscribe

काँग्रेसने 10 उमेदवारांची यादी जाहीर केली

ईशान्य दिल्लीतून कन्हैया कुमार, चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल आणि उत्तर-पश्चिम दिल्लीतून उदित राज यांना उमेदवाीर देण्यात आली आहे.

- Advertisement -

14/4/2024 22:13:54


MI VS CSK : चेन्नई सुपर किंग्जने 4 विकेट गमावत केल्या 206 धावा

- Advertisement -

मुंबई इंडियन्ससमोर 207 धावांचे आव्हान


धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश

16 एप्रिलला माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार

14/4/2024 19:43:50


राज ठाकरे सलमान खानच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहचले

14/4/2024 19:14:23


MI VS CSK : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला

14/4/2024 19:2:16


KKR VS LSG : कोलकाता नाईट रायडर्सने 8 विकेट्सने जिंकला सामना

15.4 षटकात गाठले 162 धावांचे आव्हान

14/4/2024 19:1:15


मनोज जरांगे 5 जूनपासून पुन्हा उपोषण करणार

6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण देण्याची मनोज जरांगेंची मागणी

आरक्षण न मिळाल्यास विधानसभेची तयारी करण्यार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे

14/4/2024 18:22:15


लोकसभेसाठी 100 टक्के इच्छुक – किरण सामंत

उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी किरण सामंत नागपुरात पोहचले

14/4/2024 18:17:46


भाजपा घटना आणि आरक्षण बदलणार नाही – अमित शहा

आरक्षण हटवण्यासाठी भाजपाने बहुमताचा वापर केला नाही

14/4/2024 17:2:26


अंबादास दानवे यांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी नियुक्ती

14/4/2024 17:1:53


चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादतून 100 जणांना विषबाधा झाली आहे. भद्रावती (Bhadravati) तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाप्रसाद घेतल्यानंतर जवळपास 100 जणांना त्रास सुरु झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. रामप्रेक्ष यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

14/4/2024 15:4:28


नाणेफेक जिंकत केकेआरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

14/4/2024 11:57:43


राज्य सरकार सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा देणार

सलमान खान गोळीबाराप्रकरणी सरकारकडून दखल

त्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवणार

14/4/2024 11:21:27


मनसे नेत्यांची आजची बैठक रद्द

मनसेने आज नेत्यांची बैठक बोलावली होती. परंतु ती रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. ही बैठक उद्या होण्याची शक्यता आहे.


इराणने 14 दिवसांनंतर घेतला बदल’; इस्रायलवर 200 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले

इराणने मध्यरात्री इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. इराणने इस्रायलवर 200 हून अधिक विविध प्रकारचे ड्रोन हल्ले केले आहेत, ज्यात किलर ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. जेरुसलेमसह इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये स्फोट आणि सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. इस्रायली लष्कराने हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

14/4/2024 9:40:47


पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

पंतप्रधान मोदींनी भाजपचा जाहीरनामा लाँच केला, ‘तरुण, महिला, शेतकरी, गरीब’ या घटकांवर जाहीरनाम्याात लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

आज भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा,  भाजपा अँध्यक्ष जे पी नड्डी भाजपा कार्यालयात उपस्थित आहेत.

14/4/2024 9:3:45


सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर पहाटे गोळीबार

सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झालेला आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. बाईकवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

14/4/2024 8:10:51


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -