घरमहाराष्ट्रधक्कादायक! जळगावात वापरलेल्या मास्क, हॅण्ड ग्लव्सचा होतोय गादी बनविण्यासाठी वापर

धक्कादायक! जळगावात वापरलेल्या मास्क, हॅण्ड ग्लव्सचा होतोय गादी बनविण्यासाठी वापर

Subscribe

राज्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना जळगाव जिल्हा देखील मागे नाही. जळगावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना वाढत्या रुग्णसंख्येने जळगावातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात वापरण्यात येत असलेल्या मास्कचा वापर गादी बनवण्यासाठी केला जात असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावातील कुसुंबा गावात गादी बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आणि हा कारखाना नष्ट केल्याचे सांगितले जात आहे. तर या कारवाई सोबतच पोलिसांनी कारखान्याच्या मालकावर आपत्ती व्यस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एकीकडे जळगाव जिल्ह्यात बाधितांचा वाढता आकडा जळगाव प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सर्व प्रकारचे प्रयत्न करत असताना, काही नागरिक मात्र अतिशय बेजाबदारपणाच वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

जळगावात कुसुंबा गावात वापरलेल्या मास्क आणि हॅण्ड ग्लव्सपासून गादी बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी कुसुंबा गावातील महाराष्ट्र गादी भांडार या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी मास्कचा वापर करत गाद्या तयार केल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल आणि पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई करताना पोलिसांनी मास्कचा वापर केलेल्या या गाद्या आणि शिल्लक मास्क नष्ट केले. या घटनेत गादी कारखान्याचा मालक अमजद अहमद मनसुरी याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात ६३ हजार २९४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के एवढा आहे. मागील २४ तासात ३४,००८ रुग्णांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २७ लाख ८२ हजार १६१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ एवढे झाले आहे. आजपर्यंत तपाण्यात आलेल्या २ कोटी २१ लाख १४ हजार ३७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४ लाख ०७ हजार २४५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -