घरमहाराष्ट्रपुणेउठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली...; व्हिडीओ पोस्ट करत अंधारेंचा फडणवीसांवर थेट...

उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली…; व्हिडीओ पोस्ट करत अंधारेंचा फडणवीसांवर थेट हल्ला

Subscribe

सत्तांतरानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. याच सत्तांतरानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सुषमा अंधारे यांनी प्रवेश केला होता.

पुणे : पुणे मागील काही दिवासांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत आहे. आधी एनआयएची कारवाई तर नंतर ड्रग्जमाफिया ललित पाटील याचे प्रकरण. ड्रग्जप्रकरणी रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी सरकारला धारेवर घरले होते. असे असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी X (पूर्वीचे ट्वीटर) वर व्हिडीओ शेअर करत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. नेमकं काय आहे त्या व्हिडीओमध्ये जाणून घेऊया. (Utha Utha Devendraji police car stopped… Direct attack on Fadanavis by posting video)

- Advertisement -

सत्तांतरानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. याच सत्तांतरानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सुषमा अंधारे यांनी प्रवेश केला होता. फायब्रॅंड नेत्या म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे मागील काही दिवसांपासून गृहखात्यावर ताशेरे ओढत आहेत. आधी ड्रग्जमाफिया ललित पाटीलाच्या प्रकरणावरून तर आता त्याच पुण्यात गृह विभागाचे म्हणजे पोलिसांकडून काय कारनामे केली जात आहेत याची वास्तविकता दाखविणारा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला केला आहे.

हेही वाचा : MAHARASHTRA POLITICS : कॅबिनेटमध्ये गँगवॉर; राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणे म्हणतात…

- Advertisement -

काय आहे त्या व्हिडीओमध्ये? बघाच-

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पोलीस व्हॅनचा व्हिडिओ शेअर करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतेय की, एक पोलीस व्हॅन उभी असून, त्या व्हॅनच्या आडोशाला काही पोलीस काही व्यक्तींशी बोलत आहेत. तसेच त्यांच्याकडून काहीतरी घेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पुणे जेल रोड येथील असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा : फडणवीसांपेक्षा आदित्य ठाकरेंमध्ये जास्त ‘टॅलेंट’; व्हायरल व्हिडीओ प्रकरणी राणेंचा राऊतांना टोला

व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमधून सोडले टीकेचे बाण

ट्वीटरवर व्हिडीओ पोस्ट करत सुषमा अंधारे यांनी कॅप्शनमध्ये लिहले की, उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली… पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली…
एवढेच नाही तर पुढे त्यांनी लिहले की, कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जनस्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड असा उल्लेख करत त्यांनी हा प्रकार कुठे घडलाय याचे स्थळसुद्ध नमूद केले आहे. या पोस्टनंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय प्रत्युत्तर मिळते हे पहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -