घरताज्या घडामोडीCorona : कोरोनाची तिसरी लाट मार्चमध्ये ओसरणार ; आरोग्यमंत्री राजेश टोपे...

Corona : कोरोनाची तिसरी लाट मार्चमध्ये ओसरणार ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Subscribe

कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून मार्चच्या मध्यापर्यंत ती पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. नवीन न्यूकॉन व्हेरिएंटशी सामना करण्यासही राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील काही भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी रुग्णांची संख्या घटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील कोरोना स्थितीविषयी माहिती देतान टोपे म्हणाले, कोरोनाचा न्यूकॉन हा व्हेरिंयट घातक असल्याचे प्राथमिक माहितीनुसार म्हटले जात आहे. जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे. विशेष म्हणजे त्यात मृत्यूदर ३० टक्के आहे असे सांगितले गेले आहे. तो ओमायक्रॉन इतकाच वेगाने प्रसार होणारा आहे. पण त्याचे कोणतेही बाधित रुग्ण नव्याने कुठे आढळलेले नाहीत. त्यामुळे अद्याप त्यावर काळजी करण्याची आवश्यकता नाही.

- Advertisement -

‘मास्कमुक्त महाराष्ट्र असे आम्ही कधीही म्हणालो नाही. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड अशा युरोपातल्या देशांमध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यातून काही बोध घेता येईल का? आपल्याकडील नियमांबाबत काही बदल करता येतील का? याविषयी आयसीएमआरकडे विचारणा करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

हे ही वाचा – पाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतात येऊ शकतो, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे वक्तव्य

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -