पुण्यात वसंत मोरे- संजय राऊतांची गळाभेट, वसंत मोरे म्हणाले…

पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान संजय राऊत आणि पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांची भेट झाली. लग्नसोहळ्याला दोन्ही नेते गेले होते. यावेळी वसंत मोरे आणि संजय राऊत समोरा समोर आले.

Vasant More Sanjay Raut Meet in Pune
पुण्यात वसंत मोरे- संजय राऊतांची गळाभेट, वसंत मोरे म्हणाले...

शिवसेना नेते संजय राऊत आणि पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यात भेट झाली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली आहे. परंतु भेटू असं संजय राऊत म्हणाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे वसंत मोरे नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांना मनसे पुणे शहराध्यक्षपदावरुनही हटवलं आहे. यानंतर त्यांना अनेक पक्षांकडून ऑफर येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर मोरेंना शिवसेनेकडून ऑफर मिळाले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे नाराज आहेत. त्यांना शहराध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर ते पक्ष कार्यालयापासून दूर आहेत. यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधातही नाराजी व्यक्त केली आहे. मोरे यांच्याविषयी अनेक चर्चा सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांची भेट झाली. कार्यक्रमादरम्यान संजय राऊत आणि वसंत मोरे अचानक आमने सामने आले आणि त्यांनी गळाभेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी मोरेंच्या कामाविषयी कौतुकसुद्धा केले.

पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान संजय राऊत आणि पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांची भेट झाली. लग्नसोहळ्याला दोन्ही नेते गेले होते. यावेळी वसंत मोरे आणि संजय राऊत समोरा समोर आले. कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये दोन्ही नेते एकमेकांना भेटले आणि गळाभेटसुद्धा घेतली. तात्या तुम्ही चांगल काम करत आहेत. तसेच जाता जाता संजय राऊतांनी भेटू असं म्हटल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.

वसंत मोरे काय म्हणाले?

या भेटीवर वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मी भेट घेतली नाही. आम्ही इथे नगरसेविका संगिता ठोसर यांच्या मुलाचे लग्न होते. त्या लग्नाला आलो होतो. स्टेजवरुन उतरताना योगायोगाने संजय राऊत भेटले. मी त्यांची भेट घेतली नाही तर योगायोगाने भेटलो असल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा : अनिल परबांच्या साई रिसॉर्टवरील कारवाईचा अहवाल सादर करा, केंद्राचे राज्य सरकारला पत्र