घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये तोडफोडीचे सत्र सुरूच; चार वाहनांचे नुकसान

पिंपरी-चिंचवडमध्ये तोडफोडीचे सत्र सुरूच; चार वाहनांचे नुकसान

Subscribe

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद चौकात पार्क केलेल्या चारचाकी वाहनांची अज्ञात समजकंटकांनी सिमेंटच्या ब्लॉकने दहशद पसरविण्याच्या उद्देशाने तोडफोड केली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. अज्ञात समाजकंटकांनी काळेवाडी परिसरातील चारचाकी वाहनांना लक्ष्य केले आहे. आझाद चौकातील चार वाहनांच्या काचा फोडून मोठं नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद चौकात पार्क केलेल्या चारचाकी वाहनांची अज्ञात समजकंटकांनी सिमेंटच्या ब्लॉकने दहशद पसरविण्याच्या उद्देशाने तोडफोड केली. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास समोर आली. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील ८ ते १० वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. गुरुवारी धुळवड असल्याने रस्त्याने अनेक मद्यपी वावरत होते. त्यामधीलच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली असावी, असा प्राथमिक अंदाज वाकड पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -