घरमहाराष्ट्रकुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांना जीवनगौरव पुरस्कार

कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांना जीवनगौरव पुरस्कार

Subscribe

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांना शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्यातील योगदानासाठी जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांना आग्रास्थित विस्तार शिक्षण सोसायटीतर्फे त्यांनी केलेल्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्यातील योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार-२०१८ देऊन गौरविण्यात आले आहे. सिक्किम राज्यातील राणीपुल येथे आयोजित नवव्या राष्ट्रीय विस्तार शिक्षण परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारामध्ये स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रकाचा समावेश आहे.केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. व्ही. व्ही. सदामते, इम्फाळ, मनीपूर येथील केंद्रिय कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रेमजीत सिंह तसेच विस्तार शिक्षण सोसायटीचे सचिव डॉ. जितेंद्र चौहान यांच्या उपस्थितीत डॉ. विश्वनाथा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आजवर विविध पुरस्काराने सन्मानित 

डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी बंगळुरु येथील कृषी विज्ञान विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली आहे. तामिळनाडू येथील अन्नमलाई विद्यापीठातून बौद्धिक मालमत्ता हक्क विषयात त्यांनी पीएचडी मिळवली आहे. शिक्षण, संशोधन, विस्तार आणि प्रशासन या क्षेत्राचा व्यापक अनुभव डॉ. विश्वनाथा यांना आहे. त्यांचे १०० हून अधिक शास्त्रीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी विविध पिकांचे वाण विकसीत केले आहेत. त्यांच्या कृषि क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना विविध राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

- Advertisement -

क्लीन, ग्रीन, स्मार्ट युनिव्हर्सिटी संकल्पना मांडली

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रूजू झाल्यापासून त्यांनी कृषी विद्यापीठाच्या स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले. कृषी विद्यापीठाच्या दहाही जिल्हयाच्या प्रक्षेत्रातील संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि कृषि तंत्र विद्यालयांच्या प्रक्षेत्रावर कंपोस्ट खत निर्मितीला चालना दिली आहे. तसेच कार्यालय आणि कार्यालयाच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी आठवड्यातील दोन तास सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छता अभियानात सहभाग वाढविला आहे. कुलगुरूंच्या पुढाकारामुळे या वनमहोत्सवात विद्यापीठ कार्यक्षेत्रात रोपांची लागवड करण्यात आली आहे. क्लीन, ग्रीन आणि स्मार्ट युनिव्हर्सिटी ही संकल्पना त्यांनी मांडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -