घरमहाराष्ट्रयशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार जाहीर

यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार जाहीर

Subscribe

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रातर्फे डॉ. शिवाजीराव देशमुख यांना पुरस्कार जाहीर झाला. साहित्यावर त्यांनी संशोधन केल्यामुळे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रातर्फे डॉ. शिवाजीराव देशमुख यांना पुरस्कार जाहीर झाला. चव्हाण यांच्या साहित्यावर त्यांनी संशोधन केले होते. शनिवारी (ता. २४) पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला अाहे. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आयोजित केला आहे. १५ हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे त्याचे स्वरूप आहे.

आतापर्यंत दहा पुस्तके प्रकाशित

डॉ. देशमुख यांनी ‘यशवंतराव चव्हाण व्यक्ती आणि वांड्:मय’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रबंध सादर केला होता. २००२ मध्ये त्यांना विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यावर संशोधन करणारे ते पहिले संशोधक आहेत. त्यानंतर त्यांनी चव्हाण यांच्या जीवन कार्यावर विपुल लेखन केले. व्याख्यानांच्या माध्यमातून चव्हाणांचे विचार पोहोचवले. त्यांची आतापर्यंत १० पुस्तके प्रकाशित झाली. त्यातील चार पुस्तके यशवंतराव चव्हाण यांच्यावर आहेत. या कार्याची दखल घेऊनच हा पुरस्कार असल्याचे प्रतिष्ठानचे सचिव दिनेश शिंदे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -