घरताज्या घडामोडीदुष्काळग्रस्त विदर्भात सापडली शेती करणारी पहिली मानवी वसाहत

दुष्काळग्रस्त विदर्भात सापडली शेती करणारी पहिली मानवी वसाहत

Subscribe

विदर्भाला नेहमीच दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जाते. पण याच विदर्भात पहिली शेती करणाऱ्या मानव वसाहतीचे पुरावे सापडले आहेत. नागपुरामधील उमरेड तालुक्यातील कोहळा गावाजवळ पहिली शेती करणाऱ्या मानव वसाहतीचे पुरावे सापडले आहेत

विदर्भाला नेहमीच दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जाते. पण याच विदर्भात पहिली शेती करणाऱ्या मानव वसाहतीचे पुरावे सापडले आहेत. नागपुरामधील उमरेड तालुक्यातील कोहळा गावाजवळ पहिली शेती करणाऱ्या मानव वसाहतीचे पुरावे सापडले आहेत. या पुराव्यांचे आता संशोधन केले जाणार आहे. (Vidarbha Agriculture First Human Settlement Found Archaeologist)

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल अडीच ते 3000 वर्षांपूर्वीचे हे पुरावे असून, पुरातत्त्व शास्त्राचे अभ्यासक डॉ. मनोहर नरांजे यांनी शोधून काढले आहेत. या पुराव्यांवर आता संशोधन केले जाणार आहे. येथे आढळून आलेली शिळा वर्तुळे दफनभूमी असून उत्खनन केल्यास जुना वारसा पुढे येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

उमरेडपासून ३५ तर बेला गावापासून सहा किमी अंतरावर कोहळा गाव आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. मनोहर नरांजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गावाला भेट दिली होती. एकूण 500 लोकसंख्येचे हे गाव असून, वडगाव धरणामागील बाजूस जुन्या अवशेषावरच वसले आहे.

जंगलाला लागून असलेल्या या गावाजवळ ५ ते १५ मीटर घेर असलेले शिळा वर्तुळ आढळून आले. शिळा वर्तुळ अर्थात दगडांचा गोल घेरा करून तयार केलेली दफनविधीची जागा. कोहळा जवळच्या शिळा वर्तुळांच्या निर्मितीसाठी परिसरात उपलब्ध असलेला काळा पाषाण वापरला आहे. असे शिळा वर्तुळ मोठ्या प्रमाणात असल्याचे डॉ. नरांजे यांनी नमुद केले. परंतु वसाहतीचे स्थान दुर्मिळ आहेत.

- Advertisement -

दरम्यान, अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे मानवी वसाहत स्थान आतापर्यंत नऊ ठिकाणी आढळून आले. कोहळा गावातील वसाहत स्थान हे दहावे असल्याचे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. ही सर्व शिळा वर्तुळे त्या काळातील माणसांच्या कबरी असून तिथे पुरातत्त्व विभागाने उत्खनन केल्यास त्या काळातील समृद्ध सांस्कृतिक वारसा समोर येऊ शकतो असे डॉ. नरांजे यांनी नमूद केले.

कोहळा गावाच्या दुसऱ्या बाजूला शेत शिवारामध्ये सातवाहन आणि वाकाटक काळातील अनेक अवशेषही सापडले आहे. त्यामध्ये मातीच्या विटा, पाटा वरवंट्याचे तुकडे, शिवलिंग आणि नंदी तसेच काही मूर्तींचे भग्न तुकडे आढळले आहेत.


हेही वाचा – राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; सलग पाच दिवस पाऊस म्हणजे नैसर्गिक आपत्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -