घरताज्या घडामोडीमराठा आरक्षण रद्द होण्यासाठी अशोक चव्हाणांसोबत मुख्यमंत्रीही जबाबदार, विनायक मेटेंचा घणाघात

मराठा आरक्षण रद्द होण्यासाठी अशोक चव्हाणांसोबत मुख्यमंत्रीही जबाबदार, विनायक मेटेंचा घणाघात

Subscribe

सरकार टिकवण्यासाठी अशोक चव्हाण यांचे लाड

मराठा आरक्षण रद्द होण्यासाठी मराठा आरक्षण विषयक उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळ ठाकरेही तितकेच जबाबदार आहेत. राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नाही. सोयी सवलती द्यायच्या नाहीत यांना फक्त मराठा समाजाच्या काही लोकांना पुढे करुन मराठा समाजाचा वापर करयाचा आणि आपले सरकार टिकवायचे, सत्ता टीकवायची एवढेच माहीत आहे. असा घणाघात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. विनायक मेटे पत्रकार परिषदेच बोलत होते यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकारवर चौफेर टीका करत याबाब राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

शिवसंग्रमाचे नेते विनायक मेटे यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाच्या अंतर्गत असलेल्या अनेक गोष्टी ज्या प्रलंबित आहेत त्या का करत नाहीत आणि दुसऱ्याला म्हणायचे हे केंद्र सरकारने केले पाहिजे. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून ही जी प्रवृत्ती आहे. हे अत्यंत वाईट आहे. या आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. हे वारंवार सांगत आहे. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, सोयी सवलती द्यायच्या नाहीत यांना फक्त मराठा समाजाच्या काही लोकांना पुढे करुन यातील काही चळवळीतली असतील, काही सोशल मीडियातले असतील तर काही मंत्रिमंडळातले असतील अशा लोकांना पुढे करुन मराठा समाजाच फक्त वापर करायचा आणि आपले सरकार टिकवायचे सत्ता टिकवायची सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे दुष्टचक्र करत राहायचे. ही यांची निती असून हाच त्यांचा प्लान आहे. या सगळ्याचा आम्ही निषेध करतो असे विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सरकार टिकवण्यासाठी अशोक चव्हाण यांचे लाड

मराठा आरक्षणाला जेवढे अशोक चव्हाण जबाबदार आहेत तेवढेच मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेही जबाबदार आहेत. त्यांनी गांभीर्याने कधीही हे आरक्षण घेतले नाही त्याच्याबद्दल कधी जास्त बैठका घेतल्या नाहीत. त्याचे कधी नियोजन केले नाही. अशोक चव्हाण हे वारंवार चुका करत होते. मी स्वतः अशोक चव्हाण यांच्या चुका वाचून आणि सादर करुन दाखवल्या आहेत. नांदेडला जाऊन मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवूनही सांगितले. तरी त्यांच्यावर कारवाई केली नाही. सरकार टिकवण्यासाठी त्यांचे लाड पुरवत राहिले मराठा समाजाची माती झाली तरी चालेल असे राज्य सरकारने केले आहे.

राज्यपालांना जाब विचारण्याची विनंती

केंद्र सरकारने जी भूमिका घेतलेली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो आणि याबद्दल जे वाईट पणाचे संभ्रम आणि मेसेज देत आहे. सामाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं सरकार पाहत आहे. याबद्दल लवकरच राज्यपालांना भेटून त्यांना विनंती करणार आहे की, तुम्ही राज्य सरकारला जाब विचारा की संविधानाने दिलेला अधिकार सर्वधर्म समभाव, सगळ्यांना न्याय आणि सगळ्यामध्ये चांगल्या प्रकारची वर्तवणूक याचा हे भंग करत आहे. यांना समज द्यावी अशा पद्धतीचे कारस्थान बंद करावे आणि योग्य समाजाच्या हिताचा प्रस्ताव असेल तो त्यांना राज्यपालांनी आदेश द्यावे यासाठी राज्यपालांची भेट घेणार आहोत.

- Advertisement -

फडणवीसांना राष्ट्रपतींची भेट घेण्याची विनंती

हे सरकार नाकामी आहेच नाकर्तेही आहे परंतु बुजगावणे झालेले दिसत आहे. यामुळे मराठा समाजाचा पुर्णपणे भ्रमनिराश झाला तर आम्ही स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगू की, आपण राष्ट्रपतींची भेट घ्या आणि सगळ्या मराठा समाजाला इतर समाजाच्या नेत्यांना घेऊन राष्ट्रपतींची भेट घ्या, सगळ्यांना इतर सोयी कशा मिळतील याबाबत राष्ट्रपतींशी चर्चा करावी यासंदर्भात विनंती आम्ही करणार असल्याचे विनायक मेटे म्हणाले आहेत.

मराठा मोर्चा धडकरणार हे नक्की

एवढे सगळे करुन जर काही झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल. राज्यात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये वरच्यावर शांतता पसरवली आहे. परंतु आतील खाली प्रचंड असंतोष मराठा समाजामध्ये पसरला आहे. तो असंतोष रस्त्यावर येऊ नये यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढवला आहे. हा लॉकडाऊन केवळ मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी वाढवण्यात आला आहे. तरिही मराठा समाज, शिवसंग्राम हे गप्प बसणार आहे. बीडमधून मराठा मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. परंतु तो आता १६ मे एवजी ४ ते ५ जूनला निघणार असल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -