घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरविनायक मेटे यांच्यावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार

विनायक मेटे यांच्यावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार

Subscribe

मुंबई : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आज पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात मराठा आरक्षणाचे नेते तसेच माजी आमदार विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदानानंतर त्यांचे पार्थिक मुंबईहून बीड येथे नेण्यात येणार असून तिथेच त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुंबईत आज दुपारी बोलावलेल्या मराठा समन्वय समितीच्या बैठकीसाठी शिवसंग्राम संघटनेचे नेते बीडहून येत असताना खालापूर टोलनाका येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अचानक ट्रक मधे आल्याने वेगात असलेल्या गाडीवर नियंत्रण ठेवणे मेटे यांच्या चालकाला शक्य झाले नाही. परिणामी त्यांची गाडी ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. झोपेत असलेल्या मेटे यांच्या डोक्याला मार बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

बीड ही विनायक मेटे यांची कर्मभूमी होती. तिथे मेटे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी शिवसंग्राम भवनावर गर्दी केली. कार्यकर्त्यांमध्ये शोककला पसरली आहे. कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी विनायक मेटे यांचे पार्थिव आज दुपारी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईहून बीडला नेण्यात येणार आहे. उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शिवसंग्राम भवन या ठिकाणी मेटे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे मुंबई अध्यक्ष राजन घाग यांनी दिली.

मुख्यमंत्री- उपमख्यमंत्र्यांना शोक
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक आंदोलने त्यांनी मराठा आरक्षणासाठी आणि आरक्षणाला न्याय देण्यासाठी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अध्यक्ष होते. सातत्याने त्यांची होणारी तळमळ जेव्हा-जेव्हा ते भेटले तेव्हा-तेव्हा जाणवली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिली.

- Advertisement -

अतिशय संघर्षातून आयुष्य जगत, गरिबीतून दिवस काढत विनायक मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते. मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाचे कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला. राज्याच्या राजकारणात त्यांनी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -