सलमानच्या चित्रपटासाठी शाहरूख पनवती? सलमानच्या चाहत्यांकढून ‘टायगर 3’ मधून SRK ला काढण्याची मागणी

सध्या सलमानचे चाहते ट्वीटर अकाऊंटवर #WeDontWantSRKinTiger3 असं हॅशटॅग देत शाहरूखला टायगर ३ मधून शाहरूखला काढून टाकण्याची मागणी करत आहेत.

आमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाचा प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहून बॉलिवूडमधील लोकांना चिंतेत टाकलं आहे. यादरम्यान, आता अभिनेता सलमान खानचे चाहते देखील सलमानचा आगामी टायगर ३ चित्रपट फ्लॉप होऊ नये म्हणून घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी ट्वीटरवर #WeDontWantSRKinTiger3 असं हॅशटॅग देत आहेत.

सलमानच्या चित्रपटात शाहरूख नको
सध्या सलमानचे चाहते ट्वीटर अकाऊंटवर #WeDontWantSRKinTiger3 असं हॅशटॅग देत शाहरूखला टायगर ३ मधून शाहरूखला काढून टाकण्याची मागणी करत आहेत. पूर्वी या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुतक असायचे मात्र आता सलमान खानचे चाहते शाहरूखला पनवती म्हणू लागले आहेत.

शाहरूख खानसला टायगर ३ मधून बाहेर काढण्याची मागणी

YRF Studios ला टॅग करत चाहत्यांनी सलमान खानच्या आगामी चित्रपटमधून शाहरूख खानला काढण्याची मागणी केली आहे. ट्वीटरवर एका युजरने लिहिलंय की, “आमच्या चाहत्यांकढून एक विनंती आहे की शाहरूखला टायगर ३ मधून बाहेर काढा. आम्हाला वाटतं की ही पनवती चित्रपटाला खाली पाडेल.”

तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “अजून शूटिंग सुरू झाले नाही, त्यामुळे @yrf कृपा करून टायगर ३ च्या पाहूण्या कलाकार असणाऱ्या शाहरूखला बाहेर काढा.” तिसऱ्याने लिहिलंय की, “सलमान भाऊला कोणाची गरज नाही, तो आपल्या चित्रपटाला ब्लॉकबस्टर करण्यासाठी एकटाचं पुरेसा आहे. शाहरूखला टायगर ३ मधून बाहेर काढा.”

काहींच्या मते शाहरूखने आत्तापर्यंत ज्या ज्या चित्रपटांमध्ये पाहूण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे, ते चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे सलमानचा टायगर ३ देखील शाहरूखमुळे फ्लॉप होईल अशी चाहत्यांची मागणी आहे.


हेही वाचा :राजू श्रीवास्तव यांना शु्द्धीत आणण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या ऑडिओ मेसेजचा वापर