घरमहाराष्ट्रराणेंचं अस्तित्व धोक्यात; कणकवली वगळता सर्व विधानसभेत पिछाडीवर!

राणेंचं अस्तित्व धोक्यात; कणकवली वगळता सर्व विधानसभेत पिछाडीवर!

Subscribe

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. स्वाभिमानी संघटना पक्षाच्या अंतर्गत यंदा लोकसभेला त्यांचे चिरंजीव निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उभे राहिले. मात्र याहीवेळी राणेंचं अस्तित्व धोक्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी आघाडी घेतली असून स्वाभिमानी संघटनेचे उमेदवार निलेश राणे पिछाडीवर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विनायक राऊत बाजी मारणार हेच चित्र पाहायला मिळत आहे. विनायक राऊत हे ३,६९,७६४ मतांनी आघाडीवर असून निलेश राणे मात्र २,२५,७६२ मतांवर आहेत.

रत्नागिरी -सिंधुदुर्गसाठी बाराव्या टप्प्यात झालेल्या मतदानाची आकडेवारी

  • चिपळूण – विनायक राऊत ३,८५५, निलेश राणे १,०६३
  • रत्नागिरी – विनायक राऊत ४,५९६, निलेश राणे १,६३९
  • राजापूर – विनायक राऊत ३,१११, निलेश राणे १,४३५
  • कणकवली – विनायक राऊत १८८६, निलेश राणे २,६४८
  • कुडाळ – विनायक राऊत ३,२९९, निलेश राणे २,२६६
  • सावंतवाडी – विनायक राऊत ४,२०२, निलेश राणे १,९४४

एकूण – विनायक राऊत ३,६९,७६४, निलेश राणे २,२५,७६२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -