घरताज्या घडामोडीWardha Accident: वर्ध्यातील भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत; पंतप्रधान मोदींची...

Wardha Accident: वर्ध्यातील भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत; पंतप्रधान मोदींची घोषणा

Subscribe

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे आज मध्यरात्री चारचाकीचा एसयुव्हीचा (SUV Car) वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसामधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच या मृतांमध्ये भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा सुपुत्र अविष्कार रहांगडालेचा समावेश होता. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांचा कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची आणि जखमींसाठी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

वर्ध्यात झालेल्या या भीषण अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांसोबत आपण असल्याचे सांगितले. तर जखमी लोकं लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

- Advertisement -

भाजप वर्धा लोकसभा खासदार रामदास तडस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

- Advertisement -

नक्की काय घडले? 

माहितीनुसार, सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे हे सात जण पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर परतत असताना आज मध्यरात्री एक ते दीडच्या वाजण्याच्या सुमारास वर्ध्या जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात येणारा सेलसुरा येथे हा भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे सेलसुरा जवळील नदीच्या ४० फूट पुलावरून गाडी खाली कोसळली. यामध्ये सात विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्या असून हे सर्व जण २५ ते ३५ वयोगटातील विद्यार्थी होते. या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलीस निरीक्षकही घटनास्थळी पोहोचले. पहाटे सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेबाबत मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे.

मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे 

1. अविष्कार रहांगडाले (भाजप आमदाराचा मुलगा)

2. नीरज चौहान

3. नितीश सिंह

4. विवेक नंदन

5. प्रत्युष सिंह

6. शुभम जयस्वाल

7. पवन शक्ती


हेही वाचा – Wardha Accident: वर्ध्यात भीषण अपघात! मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये भाजप आमदाराच्या मुलाचाही समावेश


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -