घरताज्या घडामोडीWardha Accident: वर्ध्यात भीषण अपघात! मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये भाजप...

Wardha Accident: वर्ध्यात भीषण अपघात! मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये भाजप आमदाराचा मुलगा

Subscribe

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे सेलसुरा जवळील नदीच्या ४० फूट पुलावरून गाडी खाली कोसळली.

वर्धा जिल्ह्यातील तिरोडामधील सेलसुरा येथे चारचाकीचा एसयुव्हीचा (SUV Car) आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. यामध्ये मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे पार्टी करून देवळीवरून वर्ध्याकडे येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. मृतांमध्ये भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा सुपुत्र अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे.

सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे हे सात जण पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर परतत असताना आज मध्यरात्री एक ते दीडच्या वाजण्याच्या सुमारास वर्ध्या जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात येणारा सेलसुरा येथे हा भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे सेलसुरा जवळील नदीच्या ४० फूट पुलावरून गाडी खाली कोसळली. यामध्ये सात विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्या असून हे सर्व जण २५ ते ३५ वयोगटातील विद्यार्थी होते. या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलीस निरीक्षकही घटनास्थळी पोहोचले. पहाटे सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

सावंगी मेडिकल कॉलेजचे ओएसडी अभ्युदय मेघे एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हणाले की, ‘हे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या वर्षातले होते. चालक नीरज सिंग एक इंटर्न होता, दोन फायनलचे विद्यार्थी होते आणि दोन पहिल्या वर्षातील विद्यार्थी होती. अविष्कार रहांगडाले आणि पवन शक्ती हे विद्यार्थी पहिल्या वर्षातील होते. त्यांच्यामधील एकाचा वाढदिवस असल्यामुळे ते साजरा करण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांचा अपघात झाल्याची आम्हाला माहिती मिळाली. यामधील एक विद्यार्थी महाराष्ट्रातला, तीन विद्यार्थी उत्तर प्रदेशमधील, दोन विद्यार्थी बिहारमधील आणि एक विद्यार्थी ओडिसामधील होता. या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची माहिती पालकांना देण्यात आली आहे.’


हेही वाचा – Corona Positive : चंद्रशेखर बावनकुळे कोरोना पॉझिटिव्ह, शेकडोंच्या गर्दीने केलं होते आंदोलन

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -