घरताज्या घडामोडीNational Voters Day: Koo Appचं मोठं पाऊल, पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांसाठी...

National Voters Day: Koo Appचं मोठं पाऊल, पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांसाठी कू अॅपचं मार्गदर्शन

Subscribe

राष्ट्रीय मतदानापूर्वी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Koo Appने मोठं पाऊल उचललं आहे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांसाठी कू अॅपने बहुभाषिक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना जाणीवपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम करणे हा त्याचा उद्देश आहे. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या मतदारांच्या मूलभूत अधिकाऱ्यांवर कू अॅप महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

कू अॅप हे पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागरूता निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचं माध्यम आहे. सर्व राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी कू अॅप मार्गदर्शन करणार असून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना हिंदी, मराठी, पंजाबी आणि इंग्रजी असा बहुभाषिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- Advertisement -

सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता

राष्ट्रीय मतदार दिन २०२२ या दिवसाची थीम सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता अशी ठेवण्यात आली आहे. ही थीम लक्षात घेऊन कू एक मार्गदर्शक लोकशाहीचा मध्यवर्ती स्तंभ म्हणून मतदानाचे महत्त्व आणि स्वातंत्र्य किंवा निष्पक्ष निवडणुकांसाठी मतदारांच्या शिक्षणात अधिक भर टाकण्याचं काम कू अॅप करतं.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कूकडून मतदारांसाठी मार्गदर्शन

‘कु’चे सीईओ आणि सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले की, मतदान हा लोकशाहीत सर्व नागरिकांना देण्यात आलेला एक मुलभूत अधिकार आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी सशक्त आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कूने मतदारांसाठी मार्गदर्शन सुरू केले आहे.

- Advertisement -

का साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिन?

भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना १९५० मध्ये झाली. दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. २०११ मध्ये राष्ट्रीय मतदार दिनाची सुरूवात करण्यात आली. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना प्रोत्साहित करणाऱ्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Koo App काय आहे ?

मार्च २०२० मध्ये कू अॅप लॉन्च करण्यात आलं. नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत अभिव्यक्त करता यावे, यासाठी कू अॅप यासारख्या बहुभाषिक आणि मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली. Koo App मध्ये बहुभाषिक पर्याय असून हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, कन्नड, तामिळ, तेलुगु, आसामी, बंगाली आणि इंग्रजीसह १० भाषांचा समावेश आहे. आपले मत किंवा विचार अभिव्यक्त करण्याासाठी या अॅपचा वापर केला जातो. राजकारण, क्रीडा, मीडिया, मनोरंजन, अध्यात्म, कला आणि संस्कृती यांसारख्या विषयांवर मूळ भाषेतून प्रेक्षकांशी संपर्क साधण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला जातो.


हेही वाचा : Virat Kohli Captaincy: विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत शेन वॉर्नचं मोठं वक्तव्य, म्हणाला…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -