घरमहाराष्ट्रनागपूरकरांनो! पाण्याचा वापर करा जपून; 'या' भागांत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

नागपूरकरांनो! पाण्याचा वापर करा जपून; ‘या’ भागांत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

Subscribe

नागपुरकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महापालिका व ऑरेंजसिटी वॉटर यांच्यामार्फत पेंच-एक जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दुरूस्तीकरणाच्या कामासाठी पुढच्या २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

नागपुरकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महापालिका व ऑरेंजसिटी वॉटर यांच्यामार्फत पेंच-एक जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दुरूस्तीकरणाच्या कामासाठी पुढच्या २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागपुरामधील धंतोली, मंगळवारी, गांधीबाग, सतरंजीपुरा व धरमपेठ या पाच झोनचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.

महापालिका व ऑरेंजसिटी वॉटर यांच्यातर्फे पेंच-एक जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळं मंगळवार २९ मार्च रोजी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यासाठी मंगळवारी सकाळी १० ते बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा अपव्यय टाळावा.

- Advertisement -

या दुरूस्तीकरमाच्या कामामुळं नागपूर शहरातील धंतोली, मंगळवारी, गांधीबाग, सतरंजीपुरा व धरमपेठ या पाच झोनचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या शटडाउनदरम्यान राजभवन येथील ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील मोठी गळती दुरुस्त करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राजभवन ते बोरियापुरा मुख्य जलवाहिनीवरील फ्लो मीटर लावण्यासाठी गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्राचे शटडाउन घेण्यात येणार आहे.

शटडाउनमुळे मंगळवारी झोनमधील राजभवन, सदर, राजनगर, गोधनी, गोरेवाडा, धंतोली झोनमधील रेशीमबाग, हनुमाननगर, वंजारीनगर नवे व जुने जलकुंभ, तर गांधीबाग झोनमधील सीताबर्डी फोर्ट जलकुंभ, सतरंजीपुऱ्यातील बस्तरवारी, बोरियापुरा मुख्य जलवाहिनी, वाहना ठिकाना जलकुंभ, बोरियापुरा जलकुंभ, धरमपेठ झोनमधील राजभवन-सीताबर्डी मुख्य जलवाहिनी आदी भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ज्यांना उद्योग नाहीत ते टीका टिप्पणी करतात – अजित पवार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -