घरताज्या घडामोडीसोलापूरात रब्बी पिकांसाठी जानेवारीच्या अखेरीस उजनी धरणातून पाणी सोडणार

सोलापूरात रब्बी पिकांसाठी जानेवारीच्या अखेरीस उजनी धरणातून पाणी सोडणार

Subscribe

सोलापूर जिल्ह्यात पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण अधिक होते त्यामुळे जिल्ह्यातील बंधारे,तलावात शहरात पुरेसा असा जलसाठा आहे. याशिवाय नोव्हेंबर महिना उलटला तरी पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे जलसाठ्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी अद्यापही केलेली नाही.त्यामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटी पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली तरच, उजनी धरणातून पाणी सोडले जाते.मात्र पुरेश्या जलसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी अद्यापही कोणती मागणी केलेली नाही. त्यामुळे यंदा जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात नाही तर, जानेवारी महिन्याच्या अखेरीस उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या हरितक्रांतीसाठी आणि जिल्ह्यातील बहुतेक शेती ओलिताखाली येण्यासाठी उजनी धरणाचे फार मोठे योगदान आहे. उजनीचा डावा आणि उजवा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. सोलापूर रब्बी पिकांसाठी प्रसिद्ध असा जिल्हा असून, खरीप पिकांच्या उत्पन्नासाठी पुढे सरसावत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित होणार असल्याची माहिती अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे. यांनी केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील शेतपिकांना नियमित पाणीपुरवठा होणे सोयीचे झाले आहे. जानेवारी महिन्यात एक वेळेस आणि उन्हाळ्यामध्ये दोन वेळा पाणी सोडल्याने शेती ओलिताखाली येऊन भरघोस पिक मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे साहजिकच उत्पन्नात वाढ होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी वापरलेल्या पाण्याचे पैसे वेळेत भरल्यास धरणासंंबंधीत उर्वरित कामे करण्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

यंदाच्या पावसाळ्यातील पावसामुळे आणि अवकाळी पावसामुळे पुरेश्या जलसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी आणि महानगरपालिकेनेही पाण्याची मागणी केलेली नाही. आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनीतील पाण्याचे पुढच्या वर्षीचे नियोजन ठरेल. मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात पाणी सोडण्यात आले होते, असे सोलापूर जिल्ह्याचे जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.


हे ही वाचा – Gopinath Munde : मुंडेसाहेब अन् बाळासाहेब असते तर… पंकजा मुंडे म्हणाल्या भविष्यात युतीचा…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -