घरमहाराष्ट्रWeather Upadate : अस्मानी संकट! 7 मार्चपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची...

Weather Upadate : अस्मानी संकट! 7 मार्चपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता – IMD

Subscribe

देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. दररोज उन्हाची ही तीव्रता अधिक वाढतेय. मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसात महाराष्ट्रसह अनेक राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 7 ते 9 मार्चपर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे. तसेच पावसाच्या मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 7 ते 9 मार्च दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पू.राजस्थान आणि प.मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता असून मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

कोणत्या जिल्ह्यात केव्हा पडणार पाऊस?

7 मार्च 2022
नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक

- Advertisement -

8 मार्च 2022
नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर,

9 मार्च 2022
नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, नांदेड

दरम्यान राज्यात दिवसेंदिवस कमाल तापमानात वाढ होत आहे. परंतु अचानक झालेल्या हवामान बदलामुळे 7 ते 9 मार्चपर्यंत आकाश ढगाळ राहणार आहे. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या दिवसांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं पुन्हा माती मोल होण्याची चिन्ह आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -