घरCORONA UPDATEलघीनघाई नडली; बस्ता बांधण्यासाठी गेले आणि...

लघीनघाई नडली; बस्ता बांधण्यासाठी गेले आणि…

Subscribe

राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली असून एका कुटुंबाला लघीनघाई चांगलीच नडली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगून देखील एका कुटुंबाला लघीनघाई चांगलीच नडल्याचे समोर आले आहे. अहमदनगरमधील पाथर्डी शहरातील एका कुटुंबाने कोरोनाचे निर्बंध मोडून चक्क कपड्यांच्या दुकानात जाऊन लग्नाचा बस्ता बांधला. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१८ जणांवर धडक कारवाई

राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या दरम्यान असणाऱ्यांनी आपले लग्न सोहळे देखील पुढे ढकलले आहेत. तर अनेकांनी घरातच लग्न समारंभ केले. तर बऱ्याच जणांनी ऑनलाईन फेसबुक लाईव्ह, व्हिडिओ कॉलद्वारे लग्न सोहळा पार पाडला आहे. तर दुसरीकडे पाथर्डीमधील कुटुंबाकडून सर्व नियम मोडून लग्नाचा बस्ता बांधण्यात आला. त्यामुळे १८ जणांवरवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ४ हजार ६६६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर देशात १८ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा – करोनाचा धसका : नाशिक जिल्ह्यात दहाच दिवसात तीन आत्महत्या 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -