घरअर्थजगत१८ जुलैपासून 'या' पदार्थांवरील जीएसटी वाढणार; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

१८ जुलैपासून ‘या’ पदार्थांवरील जीएसटी वाढणार; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

Subscribe

इंधन आणि जीवनाश्यक वस्तूंच्या किंमती मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. अशातच आता काही वस्तूंवरील जीएसटी दरात आणखी वाढ केली जाणार आहे. येत्या १८ जुलैपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे.

इंधन आणि जीवनाश्यक वस्तूंच्या किंमती मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. अशातच आता काही वस्तूंवरील जीएसटी (GST) दरात आणखी वाढ केली जाणार आहे. येत्या १८ जुलैपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. महागाईने आधीच खिसा रिकामा होत असताना आता दरवाढीची झळ आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसणार आहे. (what became cheap and what became expensive after the gst council meeting see full list)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, जीएसटी परिषदेने काही वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिषदेच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बातचित केली. त्यावेळी ते म्हणाले की, कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि घोड शर्यतीवरील कराचा प्रस्ताव पुनर्विचार करण्यासाठी मंत्रिगटाकडे पाठवण्यात आला आहे.

- Advertisement -

गोव्याच्या अर्थमंत्र्यांनी कॅसिनोवरील जीएसटी दराबाबत चर्चा करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या तीन गोष्टींवरील जीएसटीवर पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वस्तूंवर लागणार जीएसटी

- Advertisement -
  • पाकिट बंद आणि लेबल असलेल्या (फ्रोजन वगळता) खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यानुसार मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे.
  • टेट्रा पॅक आणि बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या धनादेश सेवांवर १८ टक्के आणि एटलससह नकाशा आणि चार्टवर १२ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
  • बजेट हॉटेल आणि रुग्णालयातील खोल्यांच्या दरावरही जीएसटी लागू करण्यात आला आहे.
  • हॉटेलच्या प्रतिदिवस १००० रुपये भाडे दर असणाऱ्या रुमसाठी जीएसटी लागू करण्यात आले नव्हते. आता, या खोल्यांसाठी १२ टक्के कर लागू करण्यात आला आहे.
  • रुग्णालयात रुग्णांसाठींच्या ५००० रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) ५ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

जीएसटीच्या दरात वाढ करण्यात आल्याने आता सर्वसामान्यांच्या खिशालाही कात्री लागणार आहे.


हेही वाचा – केंद्राकडून देशांतर्गत तेल उत्पादकांना मार्केटिंगचे स्वातंत्र्य, जाणून घेऊ केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -