घरमहाराष्ट्रघर ते तुरुंगापर्यंत राऊतांसोबत सावलीसारखे वावरणारे ते 'संजय' कोण?

घर ते तुरुंगापर्यंत राऊतांसोबत सावलीसारखे वावरणारे ते ‘संजय’ कोण?

Subscribe

बाळासाहेबांच्या तब्येतीच डॉक्टरांकडे वारंवार विचारपूस करायचे. त्याचीच पोचपावती म्हणूनच त्यांना जळगावचे जिल्हा संपर्कप्रमुख करण्यात आले. विशेष म्हणजे संजय राऊतांना जेव्हा अटक झाली तेव्हा घर ते जेलपर्यंत त्यांच्या पाठीराख्यासारखे वावरत होते

मुंबईः पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राज्यसभा खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने उद्धव ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊतांना पीएमएलए कोर्टाकडून जामीन मिळाला असला तरी त्यांच्या जामिनाविरोधात ईडीने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने राऊतांच्या जामिनीला तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिलाय. त्यामुळे संजय राऊतांचा सुटण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याची चर्चा आहे. परंतु संजय राऊतांच्या पडत्या काळात त्यांच्या मागे सावलीसारखी एक व्यक्ती होती. त्यांच्या खानपानाची व्यवस्था करण्यापासून त्यांच्या तुरुंगात संपर्कात राहण्यास ही व्यक्ती सक्रिय होती. तसेच ही व्यक्ती मातोश्रीच्याही एकदम जवळची आहे.

ती व्यक्ती कधीही कोणासमोर आली नाही. परंतु ईडीने अटक केल्यापासून कोर्टात संजय राऊतांची विचारपूस आणि भेटीगाठी घेण्यात ही व्यक्ती आघाडीवर होती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शिवसेनेचे नेते संजय हरिश्चंद्र सावंत हे होते. बॉम्ब हॉस्पिटलमध्ये ते युनियन लीडर आहेत, दुग्धशर्करा योग म्हणजे ते सिद्धिविनायक न्यासाचे कोषाध्यक्षही आहेत, बाळासाहेबांच्या ते अत्यंत जवळ होते, बाळासाहेब ठाकरे लीलावती रुग्णालयात असतानाही ते कायम लीलावतीच्या डॉक्टरांच्या संपर्कात असायचे.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या तब्येतीची ते डॉक्टरांकडे वारंवार विचारपूस करायचे. त्याचीच पोचपावती म्हणूनच त्यांना जळगावचे जिल्हा संपर्कप्रमुख करण्यात आले. विशेष म्हणजे संजय राऊतांना जेव्हा अटक झाली तेव्हा घर ते जेलपर्यंत त्यांच्या पाठीराख्यासारखे वावरत होते. तसेच आज जेव्हा संजय राऊत आर्थर रोड तुरुंगातून सुटून बाहेर पडले, तेव्हासुद्धा ते त्यांच्यासोबतच होते, संजय राऊत तुरुंगातून घरी परतताना सुनील राऊत यांनी गाडीचं सारथ्य केलंय. तसेच त्यांच्या बाजूलाच संजय राऊत बसले होते. विशेष म्हणजे मागच्या सीटवर संजय राऊत यांचे जावई मल्हार नार्वेकर आणि संजय सावंत बसले होते. त्यामुळे संजय सावंत आता संजय राऊतांच्या घरातील कुटुंबीयांपैकीच एक झाले आहेत.

संजय सावंत हे श्रीसिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. तसेच ते शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच शिवसेना उपनेत्या सुष्माताई अंधारे यांच्या नेतृत्वात महाप्रबोधन यात्रा जळगावातील धरणगावात आल्यानंतर तिथेही ते उपस्थित होते. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणमधून आमदार आहेत. आता त्यांच्याच विरोधात संजय सावंत निवडणूक लढवण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांना जामीन मिळताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा त्यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. शिवसेनेचे नेते संजय सावंत यांच्याकडेच मातोश्रीवरून फोन आला होता. ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र राऊत त्यावेळी कोठडीत असल्याने त्यांना थेट बोलता आले नाही. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘संजयचे अभिनंदन, मी लवकरच त्यांना भेटेन. त्यावर संजय राऊत यांनीही उत्तर देत आभार मानले.

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी विशेष पीएमएलए कोर्टाने अखेर शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. गोरेगाव येथील पत्रा चाळ (सिद्धार्थनगर) पुनर्विकास प्रकल्पात प्रवीण राऊत यांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर होता. गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा संजय सावंतांच्या नेतृत्वात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील नशिराबाद येथे शिवसेना मेळाव्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भविष्यात त्यांनी जळगाव ग्रामीण म्हणून गुलाबराव पाटलांसमोर आव्हान उभे केल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.


हेही वाचाः सुटल्याचा आनंद आहे; १०२ दिवसांनी संजय राऊत तुरुंगाबाहेर, शिवसैनिकांची तोबा गर्दी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -