घरमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे का नव्हते?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे का नव्हते?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

Subscribe

किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे सरपंचांनी सांगितले होते. तसेच ती घरं अन्वय नाईक यांनी बांधली होती, अशी माहिती समोर येत आहे. 19 बंगले नाही तर 18 घरं बांधली, त्यानंतर सीआरझेडमधली कच्ची घरं तोडली गेली. 2014 ला ही जमीन मनीषा वायकरांना विकली, अशी माहिती सरपंचांनी दिली होती.

कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काल पत्रकार परिषद घेऊन भाजपवर बाण सोडले. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेची सगळीकडेच चर्चा होती, पण संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेकडे शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे त्यावरूनच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी हल्लाबोल केलाय. चंद्रकांत पाटलांनी एकनाथ शिंदेंचं नाव घेत शिवसेनेतल्या अंतर्गत वादाचा मुद्दा उपस्थित केलाय.

संजय राऊत बोलतात मोहीत कंबोज फडणवीसांना घेऊन डुबणार, पण त्याची काळजी तुम्ही करू नका. संजय राऊत हेच उद्धव ठाकरेंना घेऊन डुबणार आहेत. पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारे संजय राऊत शिवसेनेची वाट लावणार आहेत. शिवसेनेला खड्यात घालणार आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणालेत. शिवसेनेला त्यांचे नेते गोळा होत नव्हते, मोठ्या मुश्किलीने माणसं जमवावी लागली, अशी टीका सतत भाजप नेत्यांकडून केली जात आहे. संजय राऊतांवर सतत एकटे पडले आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावलाय.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे सरपंचांनी सांगितले होते. तसेच ती घरं अन्वय नाईक यांनी बांधली होती, अशी माहिती समोर येत आहे. 19 बंगले नाही तर 18 घरं बांधली, त्यानंतर सीआरझेडमधली कच्ची घरं तोडली गेली. 2014 ला ही जमीन मनीषा वायकरांना विकली, अशी माहिती सरपंचांनी दिली होती. याच बंगल्यांवरून राज्यात सध्या मोठा पॉलिटिकल राडा सुरू आहे. सोमय्या जे बंगले सांगत आहेत ते बंगले अस्तित्वातच नाहीत, आपण जाऊन पिकनिक काढून पाहून येऊ, असे संजय राऊत मंगळवारच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

कोर्लई गावात मी स्वतः 18 तारखेला जाणार

किरीट सोमय्या हे 18 फेब्रुवारीला कोर्लई इथं जाणार आहेत. 19 बंगल्यांच्या वादग्रस्त विषयाबाबत अखेर कोर्लई गावात मी जाणार आहे, असं किरीट सोमय्यांनी सांगितलंय. आता किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावात जाऊन पाहणी करणार असल्याचं म्हटलंय. ते बंगले कुठे चोरी झाले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. त्यावर राऊतांनीही प्रतिक्रिया देत बंगले आहेत का दाखवावेत, असा टोला लगावला होता.

- Advertisement -

हेही वाचाः प्रवीण राऊतांनी ईडीच्या चौकशीत नावं घेतल्याने संजय राऊतांचा थयथयाट, नारायण राणेंचा हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -