घरमहाराष्ट्रबायकोच्या जाचातून सुटका करा हो! पुरूषांची आर्तता

बायकोच्या जाचातून सुटका करा हो! पुरूषांची आर्तता

Subscribe

औरंगाबादमध्ये स्त्री पीडित पुरूषांनी रॅली काढत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

ज्ञानोबा ..ज्ञानोबा वाचवा आता! पुरूषांना न्याय मिळालाच पाहिजे! बायकोनं मारलं सांगायचं तरी कुणाला! बायकांचा जाचापासून सुटका करा हो आता! अशा एक ना अनेक व्यथा स्त्री पुरूषांच्या दिडींत ऐकालया मिळत होत्या. कारण ती होती बायको पीडित पुरूषांची!! ‘बायको पीडित पुरूषांची संन्यासी दिंडी’ ऐकून एकदम नवल वाटलं ना? आत्तापर्यंत पुरूष पीडित स्त्री किंवा बायको असं तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं देखील असेल. पण, हे थोडं नवीन आहे नाही का? संसारापेक्षा संन्यास बरा असं म्हणत औरंगाबाद जिल्ह्यातील पुरूषांनी जागतिक पुरूष दिनाचं औचित्य साधत पायी दिंडी काढली. यावेळी पुरूषांनी त्यांच्यावर पत्नीकडून होणाऱ्या अन्यायाचा निषेध केला. संत, महंत, फकीर अशी विविध वेशभुषा करून पुरूष या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी पुरूष पीडित संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी देखील सहभाग घेतला होता. घटस्फोटीत किंवा महिलांकडून अत्याचार सहन करावा लागणाऱ्या पुरूषांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. स्त्रीवर अन्याय झाला की त्याविरोधात आवाज उठवला जातो. त्यावर चर्चा होते. पण, पुरूषांवर देखील अन्याय होतात. पुरूषांची बाजू कुणीच समजून घेत नाही. पुरूषांची दिंडी काढून आम्ही त्यातून पुरूषांचे दु:ख दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. असं अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितलं. सध्या औरंगाबादमध्ये चर्चा सुरू आहे ती स्त्री पीडित पुरूष दिडींची.

यापूर्वी स्त्री पीडित पुरूषांनी काही ठिकाणी आंदोलनं देखील केलेली आहेत. आमच्यावर देखील अन्याय होतो. मग आम्ही जायचं कुठे? कुणाला जाब विचारायचा? असा सवाल हे स्त्री पीडित पुरूष करत आहेत. औरंगाबादमध्ये काढलेल्या दिंडीतून पुरूषांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा एका अनोख्या पद्धतीनं निषेध केला आहे. राज्यात पुरूषांवर होणाऱ्या अन्यायावर आता उघडपणे चर्चा होत आहे. काही संघटना देखील स्थापन केल्या असून त्याद्वारे आता पुरूषांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -