घरमहाराष्ट्रलोकसभा लढविण्याचा विचार नाही - सुरेश प्रभू

लोकसभा लढविण्याचा विचार नाही – सुरेश प्रभू

Subscribe

मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार नसल्याचे सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे.

मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत नाही. आंध्रप्रदेशचा जरी खासदार असलो तरी कोकणच्या विकासासाठी मी कायम प्रयत्नशील राहिन. असे प्रतिपादन नागरी हवाई मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे. सावंतवाडी पर्यंटन महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. कोकण माझे माहेर आहे मला कधीही बोलवा मी कायम या ठिकाणी येईन अशी ग्वाही देखील सुरेश प्रभू यांनी दिली. 
मी जरी आंध्रप्रदेशचा खासदार असलो तरी माझे कोकणकडे लक्ष आहे. कोकण आणि कोकणी माणसाच्या विकासासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. पण, माझा लोकसभा निवडणूक लढवण्याचा तरी विचार नाही. देशात काम करत असताना माझ्या कोकणात बोलावले कि मी असतो तिथून माहेरी वळून येण्याची वाट बघत असतो. बबन साळगावकर यांनी बोलावल्या नंतर तत्काळ आलो. अशा शब्दात सुरेश प्रभू यांनी आपले कोकण प्रेम व्यक्त केले. पुढील काळात कोणतीही जबाबदारी असली तरी कोकणसाठी झटेन. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक उपक्रम आहेत. सावंतवाडीचा पर्यटन महोत्सव कोकणच्या पर्यटन विकासाला पोषक ठरेल असे मत देखील सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -