घरमहाराष्ट्रतक्रारदार आणि मुख्यमंत्र्यांच्या संभाषणाची 'ती' ऑडिओ क्लिप उघड करणार, नितीन देशमुखांचा इशारा

तक्रारदार आणि मुख्यमंत्र्यांच्या संभाषणाची ‘ती’ ऑडिओ क्लिप उघड करणार, नितीन देशमुखांचा इशारा

Subscribe

देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार आहेत. एसीबीच्या अमरावती कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती नितीन देशमुख यांनी प्रसार माध्यमांना सोमवारी दिली

अमरावती : शिंदे गटाबरोबर सुरतमार्गे गुवाहाटीला न जाता परस्पर सुरतहून मुंबई गाठणारे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) ने नोटीस पाठवली. तसेच बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी १७ जानेवारीला अमरावतीच्या कार्यालयात बोलविण्यात आल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्या विरोधातील तक्रारदाराच्या फोनवरील संभाषणाची क्लिप माझ्याकडे असल्याचा त्यांनी गौप्यस्फोट केलाय. एसीबीची नोटीस आल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना नितीन देशमुखांनी हा खुलासा केलाय.

आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी केलेल्या तक्रारीवरून मला एसीबीच्या जाळ्यात अडकवले जात आहे. आपल्याकडे माझ्याविरोधात एसीबीकडे तक्रार करणारी व्यक्ती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप आहे. तसेच तक्रारदाराची ओळख पटल्यानंतर पुरावे सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. एसीबीकडून तक्रारदारासंदर्भात माहिती मागवली असून, मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरील संभाषणात तोच तक्रारदार आहे का याची खातरजमा झाल्यानंतर ती ऑडिओ क्लिप माध्यमांकडे उघड करणार आहे. तसेच 17 जानेवारीला अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सत्य समोर आणणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

खरं तर वैभव नाईक, राजन साळवी यांच्यानंतर एसीबीची नोटीस मिळणारे नितीन देशमुख हे ठाकरे गटातील तिसरे आमदार आहेत. देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार आहेत. एसीबीच्या अमरावती कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती नितीन देशमुख यांनी प्रसार माध्यमांना सोमवारी दिली. बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी १७ जानेवारीला अमरावतीच्या कार्यालयात बोलविण्यात आल्याचे नितीन देशमुख यांनी सांगितले. एसीबीने पाठवलेल्या नोटिसीवर बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भावनाताई गवळी यांनी माझ्यावर अश्लील चाळे केल्याचे म्हणत गुन्हा दाखल केला होता. तेव्हा पहिली नोटीस आली होती. त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कलम ३५३ नुसार माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आता अमरावती येथून एसीबी कार्यालयाची नोटीस आली. मला हे अपेक्षितच होते. ईडीची नोटीस आली तरी मी घाबरणारा नाही. मला एसीबीच्या कार्यालयातून एक फोन आला होता. तुमची एसीबी कार्यालयात तक्रार दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले, परंतु नोटिशीत तक्रार कोणी केली किंवा कशाच्या आधारे करण्यात आली, याचा तपशील दिलेला नाही. माझ्याजवळ बेहिशेबी मालमत्ता नाही. १७ जानेवारीला अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माझी भूमिका स्पष्ट करेन, असे नितीन देशमुख यांनी सांगितले.


हेही वाचाः अवैध मालमत्ता प्रकरण : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -