घरमनोरंजनचित्रा वाघ यांच्या त्रासाला कंटाळून उर्फीची महिला आयोगाकडे धाव

चित्रा वाघ यांच्या त्रासाला कंटाळून उर्फीची महिला आयोगाकडे धाव

Subscribe

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. तिच्या कपड्यांवरून अनेकांनी तिला टार्गेट केले. सोशल मीडियावरचं नाही तर राज्याच्या राजकारणात आता उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांचा मुद्दा गाजतोय. उर्फी सार्वजनिक ठिकाणीही अतिशय तोकड्या कपड्यात फिरते. त्यामुळे पब्लिसिटी स्टंटसाठी ती असं करत असल्याचे अनेकांचे मत आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये सध्या सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहे. अशातच आता उर्फीने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.

उर्फीने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महिला आयोगाकडे धाव घेतली आणि त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली. शिवाय उर्फीने वकिलांचा देखील सल्ला घेतला आहे. तिच्या वकिलांनीच तिला रुपाली चाकणकरांची भेट घेण्याचा सल्ला दिला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

- Advertisement -

दरम्यान, उर्फी आधी चित्रा वाघ यांनी देखील उर्फीविरोधात तक्रार करण्यासाठी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. परंतु त्यावेळी त्यांना महिला आयोगाने उर्फीवर कारवाई करता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर चित्रा वाघ महिला आयोगावर देखील संतापल्या होत्या.

मागील अनेक दिवसांपासून गाजतोय वाद
मागील काही दिवसांपासून मॉडेल उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी टीका करत आहेत. तसेच तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली होती. त्यानंतर उर्फी जावेद सातत्याने ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचत आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसं पत्र त्यांनी पोलिसांनाही दिलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा :

राजमाता जिजाऊंची जीवनगाथा ‘स्वराज्य कनिका – जिऊ’च्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -