घरमहाराष्ट्रनागपूरबीडमध्ये जाऊन माझ्याच लोकांची घरे जाळणार? Chhagan Bhujbal यांचा जरांगे पाटलांना सवाल

बीडमध्ये जाऊन माझ्याच लोकांची घरे जाळणार? Chhagan Bhujbal यांचा जरांगे पाटलांना सवाल

Subscribe

सरकारला दमदाटी करणे की 24 तारखेला नाही झाले, तर बघतो, भुजबळांना पाहून घेतो आणि त्यांचा कार्यक्रम करतो. हे सर्व मनोज जरांगे पाटील हा उघडपणे बोलतो, या झुंझशाहीला माझा विरोध आहे, असे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ म्हणाले

नागपूर : जालन्यातील अंतरवाली सराटीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर लोकप्रतिनिधींना गावबंदी केली आणि त्यांच्या गाड्या अडविल्या. या घडनेचे पडसाद म्हणून बीडमध्ये मराठा आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घर आणि कार्यालय पेटवून दिली. बीडच्या हिंसाचारात राज्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळांचा हात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. मी बीडमध्ये जाऊन माझ्याच लोकांची घरे जाळणार का? मी एवढा अमानुष नाही, असा सवाल छगन भुजबलांनी केला आहे.

बीडमधील दंगल तुम्ही घडवल्याचा आरोप आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे, या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “बालिश म्हणतात ना, असा हा आरोप आहे. छगन भुजबळ बीडमध्ये जाऊन एवढी दंगल करू शकतो का? या प्रकरणात पकडलेली सर्वजण मनोज जरांगे पाटील यांची माणसे आहेत. बीडमध्ये माझा संबंध काय आहे? मी गेल्या कित्येक वर्षापासून बीडमध्ये गेलो नाही. मी माझ्याच लोकांची घरे जाळणार ?मी काय ऐवढा अमानुष नाही? ज्या पद्धतीने बीडमध्ये जाळपोळ केली, एवढा अमानुष नाही. मला राजकाणत 77 वर्ष झाली आहेत. मी वेगवेळ्या आंदोलनात गेलो आहे. मी जीव धोक्यात घालून आंदोलन केली आहेत. मी आजपर्यंत कोणालाही एक दगड नाही मारला, असा कुठलाही रिपोर्टमाझ्यावर नाही. तुम्ही मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या माणसाची माहिती काढा. मग कधी पिस्तुल आणि हत्यारे सापडतात. त्या लोकांवर किती केसेस आहे. त्यात किती तरी वाळू माफिया आहे. वेगवेगळे दोन नंबरचे धंदे करणारे लोक आहेत. हे सर्व आता पुढे येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : “मराठ्यांना OBCमधून आरक्षण मिळाले तर…”, छगन भुजबळांनी चिंता

ओबीसींसाठी 35 वर्षापासून देशभरात लढतोय

छगन भुजबळ म्हणाले, “मी ओबीसीची लढाई 35 वर्षापासून लढत आहे. यासाठी मी देशभरमध्ये लढत आहे. ओबीसींसाठी दिल्लीचे रामलिला मैदान भरले, पटणाचे गांधी मैदान फुल केले. पुण्याचे एसपी ग्राऊड फुल झाले आहे, अशा अनेक मोठ मोठ्या रेली करत ओबीसींसाठी लढत आहे. त्याच्यासारखे (मनोज जरांगे पाटील) यांच्यासारखे माझे काम आज सुरू नाही झाले. हे पहिल्यापासून आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Naina Project बिल्डर्स अन् दलालांच्या फायद्यासाठी, अंबादास दानवेंची रद्द करण्याची मागणी

कुठल्या महापुरुषांना बदनाम केले?

महापुरुषांना बदनाम करत आहात? या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “मी कोणत्या महापुरुषाला बदनाम केले. शिवछत्रपती, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर हे माझे देव आहेत. या सर्व महापुरुषांचे स्थान आमच्या हृदयात आहेत. अण्णाभाऊ साठे हे महापुरुष आहेत. तुला तर महापुरुषांची नावे देखील माहिती नाही. तुझ्या बॅनवर महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो नसतो.”

हेही वाचा – जुन्या पेन्शनबाबत कधी होणार निर्णय? Ajit Pawar यांनी सरकारची भूमिका केली स्पष्ट

मनोज जरांगे पाटीलच्या झुंडशाहीला विरोध

छगन भुजबळ म्हणाले, “माझा हल्ला हा मनोज जरांगे पाटील यांच्या झुंडशाहीविरोधात आहे. लोकांची घरे जाळणे, सरकारला दमदाटी करणे की 24 तारखेला नाही झाले, तर बघतो, भुजबळांना पाहून घेतो आणि त्यांचा कार्यक्रम करतो. हे सर्व मनोज जरांगे पाटील हा उघडपणे बोलतो, या झुंझशाहीला माझा विरोध आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी 58 मोर्चे काढले. तेव्हा मी विरोध केला नाही. त्या मोर्चाचे महत्व जाणून आगोदर आमच्या पृथ्वीराज चव्हाण आणि फडणवीस सरकार दोघांनी वेगवेळे कायदे केले. त्यावेळी मी हात वर करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, याला मी समर्थन केले होते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -