घरठाणेWinter Session : ठाणे मनपा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई होणार; उदय सामंत यांची...

Winter Session : ठाणे मनपा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई होणार; उदय सामंत यांची माहिती

Subscribe

नागपूर : ठाण्यातील (Thane) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) ऑगस्ट महिन्यात जवळपास 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब अशी की, या रुग्णांमध्ये एका महिन्यांचा बाळाचाही समावेश आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित करत दोषींवर रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई कधी? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. (Winter Session: Action will be taken against the culprits in the Thane municipal hospital death case; Information by Uday Samant)

हेही वाचा – Anil Parab : राज्यातील कायद्याची सध्याची परिस्थिती गौतमी पाटील, मनोज जरांगे पाटील अन् ललित पाटील अशी

- Advertisement -

ठाणे मनपा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई कधी, असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे, सचिन अहीर आदी सदस्यांनी सहभाग घेतला. अनिल परब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या आयुक्त, आरोग्य सेवा मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचा गोपनीय अहवाल शासनास प्राप्त झाला असून हा अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा – Khadse Vs Mahajan : वळू अन् भाकड जनावर…; एकनाथ खडसे-गिरीश महाजन विधान परिषदेतही भिडले

- Advertisement -

उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेशी निगडित अत्यावश्यक पदे तातडीने भरण्याबाबत तसेच औषध पुरवठा नियमितरित्या उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांतील रुग्ण सेवेची निकड, लोकसंख्या तपासून वेळोवेळी श्रेणीवर्धन करण्यात येते. तसेच रुग्णालयासाठी अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मार्फत  पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे रुग्ण सेवेमध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -