घरमहाराष्ट्रनाशिक'मुंब्रा'मधून बाळ चोरणार्‍या महिलेला नाशिकमध्ये अटक

‘मुंब्रा’मधून बाळ चोरणार्‍या महिलेला नाशिकमध्ये अटक

Subscribe

रेल्वेस्थानकात रात्रीच्या वेळी गरीब महिलांची मुले पळविणार्‍या महिलेला ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने नाशिकमध्ये अटक केली.

रेल्वेस्थानकात रात्रीच्या वेळी गरीब महिलांची मुले पळविणार्‍या महिलेला ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने नाशिकमध्ये अटक केली. या महिलेने दोन महिन्यांच्या बाळाचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसमधून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असला तरीही, महिलेने मात्र मुंब्रा रेल्वे स्टेशनमधून मुलाला पळवल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावले असून, बाळाच्या पालकांचा शोध घेतला जातो आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बाळाच्या आईची शोध सुरू केला असल्याचे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांनी सांगितले. नीलम संजय बोरा (रा. श्रध्दा पार्क, रामवाडी, नाशिक मूळ रा. गुजरात) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. मुंबईमधील मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरात सलमान खान (१०) हा बहीण सोनियासोबत (९) फिरत असताना एका बुरखाधारी महिलेने सलमानचे अपहरण केले होते. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखा, ठाणे तपास करत होते. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत असताना एक बुरखाधारी महिला संशयितरित्या फिरत असल्याचे पथकाला दिसून आले. मुंब्रा रेल्वेस्थानकातील या घटनेचा समांतर तपास सुरू असताना सहायक आयुक्त बाजीराव भोसले यांनी तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने संशयित महिलेचा माग काढला. ही महिला नाशिकमध्ये असल्याची माहिती पथकास मिळाली. पथकाने तातडीने नाशिकमध्ये येऊन नीलम संजय बोरा या संशयित महिलेला अटक करत बाळाची सुखरूप सुटका केली.

- Advertisement -

चौकशीत २९ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुलाचे अपहरण केल्याची कबुली महिलेने दिली. चौकशीत तिने स्वत: मूल नसल्याने बाळ चोरल्याचा बहाणा केला. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केली असता मूलबाळ होत नसलेल्या दाम्पत्यांना ही महिला मुले विकत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही कारवाई सहायक आयुक्त भोसले, वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे, रणवीर बयेस, संदीप बागुल, अविराज कुराडे, समीर अहिरराव, सुनील जाधव, आनंदा भिलारे, दादासाहेब पाटील, विक्रांत कांबळे, रिझवाना सय्यद यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -