घरमहाराष्ट्रबेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह ३०० फूट खोल दरीत सापडला

बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह ३०० फूट खोल दरीत सापडला

Subscribe

शिवदुर्ग या स्थानिक ट्रेकर्सच्या ग्रुप मागील तीन दिवसांपासून अलिजाचा शोध घेत होती. अखेर लायन्स पॉईंटच्या खोल दरीमध्ये ३०० फुटावर रविवारी अलिजाचा मृतदेह

लोणावळा येथील प्रसिद्ध लायन्स पाईंट येथे ३०० फूट खोल दरीत एका २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृतदेह आढळल्याचे खळबळ उडाली आहे. चार दिवसांपूर्वी या तरुणीची बॅग येथे आढळून आली होती मात्र ती स्वतः बेपत्ता होती. ही तरुणी दरीत पडली असावी, या संशयावरुन काही स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने पोलिसांनी दरीत शोध घेतल्यानंतर रविवारी तिचा मृतदेह आढळून आला.


हेही वाचा- आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांनी केली आत्महत्या

पोलिसांच्या माहितीनुसार, अलिझा राणा असे या तरुणीचे नाव असून ती मूळची हैदराबादची आहे. हिंजवडी येथील आयटीपार्कमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत ती कामाला होती. तिची बॅग या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आढळून आली होती. यामध्ये तिचे ओळखपत्र आणि मोबाईलफोनही होता. त्यावरुन पोलिसांनी तिच्या हैदराबादस्थित कुटुंबियांना याबाबत माहिती दिली आणि ती दरीच्या कड्यावरुन खाली कोसळली असल्याची शक्यता लक्षात घेऊन तिचा शोध सुरु केला.

- Advertisement -

तीन दिवसांपासून सुरू होता शोध

अलिझाचा शोध घेण्यासाठी त्यांनी शिवदुर्ग या स्थानिक ट्रेकर्सच्या ग्रुपशी संपर्क साधला आणि मागील तीन दिवसांपासून अलिजाचा शोध घेत होते. खोल दरीत संततधार पावसात या ट्रेकर्सने आपले काम सुरु केले. दरम्यान, रविवारी दुपारी ३०० फूट खोल दरीत तिचा मृतदेह ट्रेकर्सना आढळून आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -