घरताज्या घडामोडीभायखळ्यातील १ हजार खाटांचे कोविड उपचार केंद्र पुढील आठवड्यात सुरु

भायखळ्यातील १ हजार खाटांचे कोविड उपचार केंद्र पुढील आठवड्यात सुरु

Subscribe

भायखळ्यातील १ हजार खाटांचे कोविड उपचार केंद्र पुढील आठवड्यात सुरु करण्यात येणार आहे.

भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील कोविडचे एक मोठे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. तब्बल १ हजार खाटांची क्षमता असलेल्या उपचार केंद्राच्या उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हे उपचार केंद्र जून महिन्याच्या अखेरीस रुग्ण सेवेत दाखल होईल, अशी माहिती ‘इ’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली आहे.

३०० खाटा असलेले ‘ऑक्सीजन बेड’

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह शहर यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात येत असलेल्या या ‘कोविड कोरोना १९’ बाधित रुग्णांवर उपचार १ हजार खाटांपैकी ३०० खाटा या ‘ऑक्सीजन बेड’ असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ५० डॉक्टर्स, १०० नर्सेस आणि १५० परिचर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी, असे एकूण ३०० कर्मचारी दिवसाचे २४ तासं अव्याहतपणे कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर बाबी देखील गरजेनुरूप उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत.

- Advertisement -

अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनात व ‘परिमंडळ १’चे उपायुक्त हर्षद काळे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले हे काम आता अंतिम टप्प्यात असून या महिना अखेरीस हे ‘जम्बो फॅसिलिटी’ उपचार केंद्र कार्यान्वित होईल. ‘परिमंडळ १’ चे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद आष्टेकर आणि ‘इ’ विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर निपा मेहता यांनी सांभाळली, ‘इ’ विभागातील परिरक्षण खात्यातील सहाय्यक अभियंता अक्षय जगताप, दुय्यम अभियंता पूजा तावडे यांनी अथक मेहनत घेतली असल्याची माहिती दगडखैर यांनी दिली आहे.

- Advertisement -

केवळ १५ दिवसात १ हजार खाटांचे रुग्णालय

तब्बल १ हजार खाटांचे हे तात्पुरत्या स्वरूपातील उपचार केंद्र उभारण्यास दिनांक १० जून २०२० रोजी सुरुवात झाली. त्यानंतर अक्षरश: दिवस-रात्र पद्धतीने उपचार केंद्राची उभारणी सुरू असून महापालिकेचे अनेक अभियंते – कामगार – कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस राबत आहेत. या महिनाअखेरीस हे उपचार केंद्र रूग्णात सेवेत दाखल होणार असल्याने केवळ १५ ते २० दिवसात या उपचार केंद्राची उभारणी करण्यात येत आहे.


हेही वाचा – लहान मुलांसह वयोवृध्द व्यक्ती अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अडचण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -