घरCORONA UPDATECoronaVirus: गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे ११६ नवे रुग्ण, आकडा ६०६वर!

CoronaVirus: गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे ११६ नवे रुग्ण, आकडा ६०६वर!

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान घातलं आहे. देशात देखील कोरोना व्हायरसचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ११६ नवे रुग्ण आढळले असून मुंबईत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०६वर पोहोचला आहे. त्यापैकी आतापर्यंत मुंबईत ५ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मुंबईत एकूण मृतांचा आकडा ४० झाला आहे. तसंच आज कोणताही रुग्ण बरा झाला नसल्याचं दैनिक अहवालातून समोर आलं आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आज आढळलेल्या मुंबईतील एकूण रुग्णांपैकी ५५ रुग्ण हे महापालिकेने घरोघरी शोध मोहिमेमुळे तसेच रुग्ण शोध क्लिनिक आणि सर्व संशयित रुग्णांची वेळेत चाचणी केल्यामुळे सापडले आहेत. यासर्व रुग्णांची चाचणी करून त्याचे विलगीकर आणि उपाचर सुरू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

महापालिकेकडून मुंबईमध्ये कोरोना रुग्ण शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरू करण्यात येत आहेत. ६ एप्रिलपर्यंत मुंबईमध्ये २० क्लिनिक सुरू करण्यात आले असून त्यामध्ये ६१४ जणांपैकी १८५ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहे.

आतापर्यंत राज्यातील नवे रुग्णांची संख्या

मुंबई महापालिका – ११६
पुणे महापालिका – १८
अहमदनगर – ३
बुलढाणा -२
ठाणे – २
नागपूर – ३
सातारा – १
औरंगाबाद – ३
रत्नागिरी – १
सांगली – १
एकूण – १५०

- Advertisement -

राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १०१८


हेही वाचा – CoronaVirus: २४ तासात लपलेल्या तबलीग सदस्यांनी पोलिसांना शरण जा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -