घरमुंबईनवी मुंबईत १०५ किलो गांजा जप्त; ट्रॅव्हल्स बससह रिक्षा जप्त

नवी मुंबईत १०५ किलो गांजा जप्त; ट्रॅव्हल्स बससह रिक्षा जप्त

Subscribe

या कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक करुन ट्रॅव्हल्स बससह एक रिक्षा जप्त केली आहे. फरार दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बुलढाणा-मुंबई या बसच्या लगेजमधून वाहतूक होत असलेला सुमारे १४ लाख रुपये किंमतीचा १०५ किलो वजनाचा गांजा एपीएमसी पोलिसांनी गुरुवारी सकाळी जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक करुन ट्रॅव्हल्स बससह एक रिक्षा जप्त केली आहे. कारवाई वेळी फरार झालेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

रिक्षाद्वारे गांजाची दुसऱ्या ठिकाणी वाहतूक

या कारवाईत जप्त करण्यात आलेली चाणक्य ट्रॅव्हल्सची बस बुलढाणा येथून मुंबईत दादर येथे जाणारी असून या ट्रॅव्हल्स बसच्या लगेजमधून मोठ्या प्रमाणात गांजा आणण्यात आला होता. सदर गांजा एपीएमसी भागात उतरविण्यात आल्यानंतर हा गांजा रिक्षातून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार होता. त्यामुळे गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास या प्रकरणातील काही आरोपी रिक्षा घेऊन या ट्रॅव्हल्स बसची वाट पहात होते. याबाबतची माहिती एपीएमसी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सचिन ठोंबरे यांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एम.पवार, पोलीस हवालदार चंद्रकांत कदम, खैरे, सचिन ठोंबरे, किरण राऊत, संदेश म्हात्रे, जयपाल गायकवाड आदींच्या पथकाने सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथील पेट्रोप पंपाजवळ सापळा लावला होता.

- Advertisement -

फरार झालेल्या दोघांचा शोध सुरु

सकाळी १०च्या सुमारास सदर बस त्याठिकाणी आली असताना, दबा धरुन बसलेल्या पथकाने ट्रव्हल्स बस व रिक्षा ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅव्हल्स बसची तपासणी केली असता, सदर बसच्या लगेजमध्ये तब्बल १०५ किलो वजनाचा गांजा लपवून आणण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सदरचा गांजा जप्त करुन राहुल चव्हाण (२७), प्रविण चव्हाण (२७), अशिष यादव (२४) आणि सुनिलकुमार यादव (२९) या चौघांवर एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चाणक्य ट्रॅव्हल्सची बस आणि एक रिक्षा जप्त केली आहे. या कारवाईदरम्यान, दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -