घरमुंबईCoronavirus: पुन्हा रुग्णात वाढ! गेल्या २४ तासांत १,१४४ नवे रुग्ण; ३८ जणांचा...

Coronavirus: पुन्हा रुग्णात वाढ! गेल्या २४ तासांत १,१४४ नवे रुग्ण; ३८ जणांचा मृत्यू

Subscribe

आतापर्यंत मुंबईत ३७ हजार १० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ११४ कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंगळवारी मुंबईत ज्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८०० च्या घरात होती, ती संख्या आज बुधवारी वाढून १ हजारांहून अधिक झाली आहे. तर ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६९ हजार ६२५ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ३ हजार ९६२ झाली आहे. तसेच आज २ हजार ४३४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईत ३७ हजार १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

- Advertisement -

एकूण मृत रुग्णांपैकी ७६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ७३ रुग्ण पुरुष आणि ४७ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ८ जणांचे वय ४० वर्षाखाली होते, ७४ जणांचे वय ६० वर्षा वर होते, तर उर्वरित ३८ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते. मृतांपैकी ३८ मृत्यू हे गेल्या ४८ तासांमधील आहेत.

आतापर्यंत तब्बल ३७ हजारांपेक्षा अधिकांना डिस्चार्ज

मुंबईत कोरोनाचे ८४७ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ४८ हजार ६९८ वर पोहचली आहे. तसेच २ हजार ४३४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३७ हजार १० जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

२ लाखांहून अधिक झाल्या कोरोनाच्या चाचण्या

मुबंई जिल्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ५३ टक्के झाला असून २३ जून २०२० पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या २ लाख ९९ हजार ३७९ इतक्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.


Corona Update: राज्यात मागील २४ तासांत ४ हजार १६१ जणांना मिळाला डिस्चार्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -