घरताज्या घडामोडीबॉडी बॅग खरेदीतील आरोप प्रकरणी कंपनीची पोलीस ठाण्यात धाव

बॉडी बॅग खरेदीतील आरोप प्रकरणी कंपनीची पोलीस ठाण्यात धाव

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णांचे शव सुरक्षित बंदिस्त करून ठेवत अंतिम संस्कारासाठी पाठवण्यासाठी खरेदी केलेल्या बहुचर्चित कंत्राटाप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करण्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात मानहानी नुकसानीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचे शव सुरक्षित बंदिस्त करून ठेवत अंतिम संस्कारासाठी पाठवण्यासाठी खरेदी केलेल्या बहुचर्चित कंत्राटाप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करण्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात मानहानी नुकसानीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे. महापालिकेने वाढीव दराने शव पिशव्या खरेदी केल्याचा आरोप अंजली दमानिया आणि विवेकानंद गुप्ता यांनी केला होता. या दोघांच्या विरेाधात कंपनीने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५नुसार तसेच मानहानी नुकसानीच्या कलमाअंतर्गतही गुन्हा दाखल करण्याची मागणी वेदांत इन्नोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आझाद मैदान पोलिसांकडे अर्जाद्वारे केली आहे.

मुंबई महापालिकेने कोरेानाबाधित रुग्णांच्या शवामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, म्हणून शव बंदिस्त करून अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यासाठी वेदांत इन्नोटेक प्रायव्हेट कंपनीकडून ६ हजार ७०० रुपयांना शव पिशव्या अर्थात बॉडी बॅगजची खरेदी केली. परंतु, ही खरेदी वाढीव दराने करत महापालिकेत मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरेाप केला. अंजली दमानिया यांनी २०० ते १२०० रुपयांमध्ये तर विवेकानंद गुप्ता यांनीही १३५० रुपयांमध्ये ही बॅग केईएम रुग्णलयात खरेदी केल्याचे प्रसारमाध्यमांसमोर सांगत महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरेाप केले होते.

- Advertisement -

मानहानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी केला अर्ज

या पार्श्वभूमीवर वेदांत इन्नोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने २२ जून २०२० रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. याअर्जासोबत त्यांनी पुरावेही जोडले आहे. या अर्ज स्वरुपातील तक्रारीमध्ये कंपनीने आमची कंपनी आपत्ती व्यवस्थापन साधनांची निर्मिती आणि उत्पादन करत असल्याचे नमुद केले आहे. याअंतर्गत कोरेानासाठी लागणाऱ्या सुधारीत शव पिशव्या अर्थात लीकप्रुप बॉडी कव्हर बॅग मुंबई महापालिकेला ३ महिन्यांपासून लॉक-डाऊनच्या काळात पोलीस परवानगीसह केंद्र शासनाच्या नियमानुसार आणि दरापेक्षा कमी दराने पुरवठा करत असल्याचे म्हटले आहे. या साधनांच्या निर्मितीसाठी टेक्निकल डेव्हलपमेंट बोर्डने विशेष अनुदानही दिलेले आहे. या साधनांचे पेटंट प्राप्त असून एफआयसीसीआय तसेच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थेचे पुरस्कारही प्राप्त झालेली आहे. आमची कंपनी आयएसओ प्रमाणित असून महापालिकेने खरेदी केलेली बॉडी बॅग ही जीईएम पोर्टलवरही उपलब्ध आहे.

गुप्ता आणि दमानिया यांनी संगनमताने अपप्रचार करून महापालिकेची ऑर्डर निघण्यापूर्वीच २ हजार बॉडी बॅगची निविदा १३ जून रोजी दबाव आणून रद्द केली. त्यामुळे ३ हजार बॉडी बॅगची फेरनिविदा काढण्यात आली. आपत्कालिन परिस्थितीत दर आठवड्याला निघणाऱ्या ५०० बॉडी बॅगची मागणी टिव्ही आणि प्रेसमधील खोट्या बातम्यांमुळे रद्द झाली. त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे कंपनीचे संचालक सतीश कल्याणकर यांनी पोलीस तक्रारीच्या अर्जात नमुद केले आहे. महापालिकेने ३ वेळा निविदा काढून तसेच कठिण परिस्थितीत केंद्र शासनाच्या गव्हमेंट ई मार्केटिंग पोर्टवरील ठरवलेल्या दरापेक्षा कमी दराने पुरवठा केला आहे. तरीही जास्त दराने पुरवठा केल्याचा खोटा प्रचार केल्यामुळे सामाजाचे व कंपनीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलेच असून कोरोनाचा संसर्गजन्य आजार वाढवण्यासही मदत झाली असल्याचे कल्याणकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona: नगरसेवक निधीतून आर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप करता येणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -