घरमुंबईसिंगापूरमधून हॅकर्सने केली मुंबईची बत्ती गुल?

सिंगापूरमधून हॅकर्सने केली मुंबईची बत्ती गुल?

Subscribe

गेल्या महिन्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमधील बऱ्याच भागातील वीजपुरवठा अचानक खंडीत झाला होता. या प्रकरणावर भाष्य करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजपुरवठा खंडीत होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले होते. दरम्यान, एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सिंगापूरमध्ये बसून हॅकर्सने मुंबईची वीज घालवली, असे वृत्त समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतची बातमी दिली आहे.

१२ ऑक्टोबरला वीज पुरवठा खंडीत झाला होता. मुंबईसह उपनगरांतील काही भागांत वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी रात्रीचे अकरा वाजले होते. अचानक वीज जाण्यामागे सिंगापूरमधून कोणाचा तरी हात असल्याचे वृत्त आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने बातमीत म्हटले आहे की, महिनाभर करण्यात आलेल्या तपासानंतर वीजवितरण करणाऱ्या व्यवस्थेच्या सर्व्हरवर संशयास्पद लॉग-इन झाल्याचे दिसून आले आहे. सिंगापूर आणि दक्षिण आशियातील अन्य देशांमधून लॉग-इन करण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागे कोमाचा हात आहे, याचा तपास मुंबई पोलीस राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मदतीने करत आहेत. मुंबई सायबर गुन्हे विभाग या प्रकरणाची चौकशी करत असून पोलिसांना या प्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असल्याचे बोलले जात आहे. विदेशातून वीज ठप्प करण्यात आली असे तपासातून दिसून येत आहे, असे इंग्रजी वृत्तपत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

१२ ऑक्टोबरला मुंबईसह उपनगरात वीज खंडीत

मुंबई आणि उपनगरांत १२ ऑक्टोबरला वीज पुरवठा खंडीत झाला होता. मुंबई आणि परिसराला कळवा-पडघा जीआयएस केंद्रातून वीज पुरवठा केला जातो. कळवा-पडघा जीआयएस केंद्रात दोन सर्किट आहेत. १२ ऑक्टोबरला पहाटे सर्किट एकमधून वीज पुरवठा सुरु असतानाच जादा व्होल्टेजमुळे वाहिनी बंद झाली होती. त्यामुळे त्याचा भार सर्किट दोनवर टाकला होता. त्यानुसार वीज पुरवठा सुरु असतानाच सकाळी दहा वाजता यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईसह उपनगारांत वीज पुरवठा खंडीत झाला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -