घरताज्या घडामोडीCoronavirus: ब्रिटनहून मुंबईत आलेले १२ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह!

Coronavirus: ब्रिटनहून मुंबईत आलेले १२ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह!

Subscribe

ब्रिटनहून आलेल्या १२ कोरोनाबाधित प्रवाशांची चौकशी करून पालिकेने त्यांना क्वारंटाईन केले आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोना व्हायरसचं नवं रुप (स्ट्रेन) आता जगभरात अनेक देशात पसरत आहे. भारतात देखील ब्रिटनहून आलेले अनेक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटनहून मुंबई आलेले १२ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. २१ ते २५ डिसेंबर दरम्यान ब्रिटनहून मुंबईत आलेल्या प्रवाशांची नियमांनुसार मुंबई विमानतळावरती आरटी-पीआर टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासर्व कोरोनाबाधित रुग्णांची चौकशी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच या रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीकरता पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान मुंबईत काल (सोमवारी) दिवसभरात ५५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ७२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९१ हजार ४७१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ८८ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ७१ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के एवढे आहे. पण ब्रिटनहून आलेले १२ प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

राज्यातील अनेक जिल्ह्यात ब्रिटनहून आलेले काही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे. इंग्लंडहून पुण्यात आलेल्या १०९ प्रवाशांसोबत संपर्क होत नसल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती सोमवारी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली असून सध्या १०९ जणांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.


हेही वाचा – Coronavirus: आता दक्षिण कोरियात पोहोचला कोरोनाचा नवा स्ट्रेन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -