घरमुंबईCoronavirus: धारावीतील २५०० लोकांना केले होम क्वारंटाईन

Coronavirus: धारावीतील २५०० लोकांना केले होम क्वारंटाईन

Subscribe

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाने केला शिरकाव; बालिगा नगर परिसरातील २ हजार ५०० लोकांना होम क्वारंटाईन

आतापर्यंत जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या १० लाख २२ हजार १६३वर पोहोचली आहे. त्यापैकी ५३ हजार ४२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून हा आकडा ४२३ वर पोहोचला आहे. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आता कोरोनाने शिरकाव केला आहे. बालिगा नगरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या एका ५६ वर्षीय रुग्णाचा बुधवारी रात्री मृत्यू झाला आहे. तर तो राहत असलेल्या एसआरए इमारतीला सीलदेखील करण्यात आले आहे. तसेच धारावीमधील बालिगा नगर परिसरातील २ हजार ५०० लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Corona Live Update: धारावीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह

बालिगा नगरमधील कोरोनाने ५६ वर्षीय व्यक्तीचा बळी घेतल्यानंतर २४ तासांत याच परिसरात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीलाही कोरोना व्हायरसची लागण झाली. या भागात ३०८ सदनिका आणि एकूण ९१ दुकानं असल्याने संपूर्ण परिसरच सील करण्यात आला आहे. तसेच या भागातील अडीच हजार लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली असून त्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. हा भाग सील करताना मुंबई महानगर पालिकेकडून नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तूंची सेवा पुरविल्या जात आहे.

- Advertisement -

२३ कर्मचाऱ्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का

वरळी भागात राहणारा बालिगा नगर परिसरात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ५२ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने त्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच धारावीत काम करणाऱ्या २३ कर्मचाऱ्यांच्या हातावरही होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -